• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'विराट आणि BCCI मध्ये सर्व आलबेल नाही', दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा

'विराट आणि BCCI मध्ये सर्व आलबेल नाही', दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा

विराट कोहली (Virat Kohli ) यानं टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराट आणि बीसीसीआयमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचा दावा दिग्गज क्रिकेटपटूनं केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहली (Virat Kohli ) यानं टीम इंडियाच्या टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि वर्ल्ड कप टीमचे सदस्य संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी विराटच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी विराट आणि बीसीसीआय यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पाटील निवड समितीचे अध्यक्ष असतानाच विराट सर्वप्रथम कॅप्टन झाला होता. संदीप पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, 'मी विराटच्या या निर्णयाचं स्वागत करतो. कॅप्टनसीचं मानसिक ओझं असतं. एकाच वेळी टीमची कॅप्टनसी आणि बॅटींगवर लक्ष केंद्रीत करणे सोपे काम नाही. विशेषत: सध्याच्या काळाच तर खूपच जास्त क्रिकेट खेळले जात आहे. कोहलीच्या या निर्णयामुळे त्याला बॅटींवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यास 100 टक्के मदत होणार आहे. पाटील यांनी यावेळी विराट आणि बीसीसीआय यांच्या संबंधांवरही भाष्य केलं. 'विराट आणि बीसीसीआय यांचं हल्ली फार पटत नाही. याबाबत दोघांमध्ये संवादाची कमतरता आहे, असं वाटत आहे. काही दिवसांपूर्वी विराट कॅप्टनसी सोडणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्यावेळी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमळ यांनी ते पूर्णपणे फेटाळले होते. कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय हा पूर्णपणे विराटचा आहे. बीसीसीआयनं तो मान्य करायला हवा.' असे पाटील यांनी स्पष्ट केले. भारतानंतर पाकिस्तानमध्ये बदलाचे वारे, बाबर आझमच्या कॅप्टनसीवर टांगती तलवार! BCCI नं फेटाळली होती विराटची मागणी 'पीटीआय'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीनं केलेली एक विशेष मागणी बीसीसीआनं मान्य केली नव्हती.  रोहित शर्माला वनडे टीमच्या उपकर्णधार पदावरून हटविण्यात यावं, असा प्रस्ताव विराटने दिला होता. रोहित 34 वर्षांचा आहे, हे यामसाठी कारण त्यानं दिलं गेलं होतं. वनडे टीमचं उपकर्णधारपद केएल राहुलला सोपविण्यात यावं, अशी विराटची इच्छा होती.' मात्र निवड समितीला विराटची ही मागणी पटली नाही.
  Published by:News18 Desk
  First published: