• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारतानंतर पाकिस्तानमध्ये बदलाचे वारे, बाबर आझमच्या कॅप्टनसीवर टांगती तलवार!

भारतानंतर पाकिस्तानमध्ये बदलाचे वारे, बाबर आझमच्या कॅप्टनसीवर टांगती तलवार!

पाकिस्तान क्रिकेटमध्येही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांच्या ताज्या वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोहली आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) हे पद सोडणार आहे. आता विराटच्या जागी कॅप्टन कोण होणार? याची चर्चा देशात सुरू झाली आहे. त्याचवेळी शेजारच्या पाकिस्तान क्रिकेटमध्येही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांच्या ताज्या वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. 'आपल्याला बाबर आझमकडून त्याच अपेक्षा आहेत ज्या इम्रान खान (Imran Khan) पासून होत्या.' असं अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत राजा यांनी स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला विजेतेपद मिळवून देण्यात बाबर अपयशी ठरला तर त्याला कॅप्टनसीपदावरुन दूर केले जाऊ शकते, असा काढला जात आहे. बाबरनं फेटाळली शक्यता बाबर आझमनं मात्र ही शक्यता फेटाळली आहे.  'आपल्याला कॅप्टनसीमधील बदलाबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. तसंच त्याबद्दल मी काही ऐकलंलं नाही. ही क्रिकेट विश्वातील सामान्य गोष्ट आहे. कॅप्टनला टार्गेट पूर्ण करावं लागतं. तसंच अपेक्षांची पूर्तता करावी लागते,' असं त्यानं सांगितलं. बाबरनं आपलं लक्ष्य हे न्यूझीलंड विरुद्धच्या दौऱ्यावर असल्याचं स्पष्ट केलं. केन विल्यमसन, टिप सिफर्टस डेवॉन कॉनवे, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, काईल जेमीसन आणि लॉकी फर्ग्युसन हे न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमध्येही न्यूझीलंड पाकिस्तानला कडवी झुंज देईल अशी अपेक्षा आहे. विराट कोहलीनं कॅप्टनसी का सोडली? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण पाकिस्तान आणि टी 20 वर्ल्ड कपचं यजमानपद भूषविणाऱ्या यूएईमधील परिस्थिती समान आहे. त्यामुळे न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धची आगामी सीरिज महत्त्वाची आहे, असं बाबरं यावेळी म्हणाला.
  Published by:News18 Desk
  First published: