अहमदाबाद, 29 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) या आयपीएलमध्ये (IPL 2021) जोरदार कामगिरी होत आहे. आरसीबीनं आत्तापर्यंत सहापैकी पाच सामने जिंकले असून फक्त एकच पराभव स्वीकारला आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध मंगळवारी झालेला सामना आरसीबनं अवघ्या एक रननं जिंकला होता. विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डीव्हिलियर्स (Ab de Villiers) हे दोघं जण आरसीबीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. या दोघांचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या आपल्या छोट्या फॅन्ससाठी या दोघांनी केलेल्या कृतीमुळे तुम्हाला त्यांना नक्कीच सॅल्यूट करावा वाटेल.
काय आहे प्रकरण?
प्रियांशू हा दिल्लीचा एक चिमुकला एबी डीव्हिलियर्सचा फॅन आहे. प्रियांशूला ऱ्हदयविकाराचा एक दुर्मिळ आजार आहे त्याच्यावरील उपचारासाठी 'ब्लड डोनर्स ऑफ इंडिया' ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न आहे. या प्रयत्नामुळे नुकतीच अमेरिकेतल्या बोस्टनमध्ये त्याच्यावर एक यशस्वी ऑपरेशन झालं.
प्रियांशू डीव्हिलियर्सचा फॅन असल्यानं या संस्थेनं डीव्हिलियर्सशी संपर्क साधला. डीव्हिलियर्सनं संस्थेच्या विनंतीनुसार एक खास व्हिडीओ तयार केला असून यामध्ये विराट कोहली देखील सहभागी झाला. "प्रियांशू तू आमच्यासाठी प्रेरणा आहे. तू एका मोठ्या आव्हानाचा सामना केलास. तू यामध्ये विजयी झालास याचा आनंद आहे. तू लवकरच भारतामध्ये परत येशील,'' अशी भावना डीव्हिलियर्सनं या व्हिडीओमध्ये व्यक्त केली आहे.
तर, " प्रियांशू मला तुझ्या ऑपरेशनबद्दल कळलं. ज्या परिस्थितीवर तू मात केलीस आहेस ते पाहता तू खूप शूर आहेस. तू लवकरच पूर्ण बरा होशील, अशी मला आशा आहे, असा मेसेज विराटनं दिला आहे.
A child, Priyanshu, from Delhi, had a very serious heart disorder, and had to be operated by Dr. Sitaram Emani in Boston. @crowngaurav from @BloodDonorsIn worked for 3 yrs to collect the money from donors. The boy is now safe, after surgery. Watch this video! #RCB #IPL pic.twitter.com/ji39Gm9h3M
— Blood Donors India (@BloodDonorsIn) April 29, 2021
विराट आणि डीव्हिलियर्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दोघांच्या अनेक फॅन्सनी या व्हिडीओचं स्वागत केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.