मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /17व्या वर्षी जिगरी दोस्तासह बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, 4 टेस्टमध्ये ठोकल्या 2 डबल सेंच्युरी; तरीही दोन वर्षात करिअर संपुष्टात

17व्या वर्षी जिगरी दोस्तासह बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, 4 टेस्टमध्ये ठोकल्या 2 डबल सेंच्युरी; तरीही दोन वर्षात करिअर संपुष्टात

आपलं कौशल्य नीट सांभाळता आलं नाही तर अनेकदा खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम होते. काहींचं तर संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाल्याचीही उदाहरणं आपल्याकडे आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) चांगला मित्र आणि माजी भारतीय टेस्ट प्लेअर विनोद कांबळीसोबत (Vinod Kambli) हेच घडलं.

आपलं कौशल्य नीट सांभाळता आलं नाही तर अनेकदा खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम होते. काहींचं तर संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाल्याचीही उदाहरणं आपल्याकडे आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) चांगला मित्र आणि माजी भारतीय टेस्ट प्लेअर विनोद कांबळीसोबत (Vinod Kambli) हेच घडलं.

आपलं कौशल्य नीट सांभाळता आलं नाही तर अनेकदा खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम होते. काहींचं तर संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाल्याचीही उदाहरणं आपल्याकडे आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) चांगला मित्र आणि माजी भारतीय टेस्ट प्लेअर विनोद कांबळीसोबत (Vinod Kambli) हेच घडलं.

पुढे वाचा ...

  मुंबई, 18 जानेवारी: आपलं कौशल्य नीट सांभाळता आलं नाही तर अनेकदा खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम होते. काहींचं तर संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाल्याचीही उदाहरणं आपल्याकडे आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) चांगला मित्र आणि माजी भारतीय टेस्ट प्लेअर विनोद कांबळीसोबत (Vinod Kambli) हेच घडलं. त्याने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पहिल्या सात टेस्ट मॅचमध्ये दोन डबल सेंच्युरी (Double Century) आणि दोन सेंच्युरी झळकावल्या होत्या. एक बॅट्समन (Batsman) म्हणून कांबळीची क्षमता सिद्ध करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. असं असूनही त्याचं टेस्ट करिअर (Test career) अवघ्या दोन वर्षांतच संपुष्टात आलं. त्याचा फॉर्म, त्याचा बिघडलेला स्वभाव आणि बेशिस्तपणा यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं.

  इंडियन क्रिकेटमधील सर्वांत प्रतिभावान खेळाडूंपैकी एक असलेल्या कांबळीचा आज 50वा वाढदिवस (Vinod Kambli Birthday) आहे. त्याचा जन्म 18 जानेवारी 1972 रोजी मुंबईतील इंदिरानगरमध्ये झाला होता.

  हे वाचा-"Match Fixing साठी मिळाली होती 40 लाखांची ऑफर" भारतीय क्रिकेटरच्या दाव्याने खळबळ

  विनोद कांबळीचं बालपण गरिबीत गेलं. त्याचे वडील गणपत कांबळी हे मेकॅनिक (Mechanic) होते. आपल्या तुटपुंज्या कमाईवर ते सात लोकांचं कुटुंब सांभाळत होते. आर्थिक स्थिती चांगली नसतानाही त्यांनी कधीही आपल्या मुलाला क्रिकेट खेळण्यापासून रोखलं नाही. कारण गणपत कांबळी स्वतः एक क्रिकेटर होते आणि त्यांनी मुंबईत क्लब क्रिकेट (Mumbai Club Cricket) खेळलं होतं. आपल्या वडिलांकडून मिळालेला क्रिकेटचा वारसा घेऊन विनोद कांबळीनं लहान वयातच आपल्या प्रतिभेच्या जोरावर मुंबई क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली होती. शालेय क्रिकेटमध्ये विनोदची सचिन तेंडुलकरसोबत ओळख झाली आणि नंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. सचिन-विनोदची जोडी क्रिकेटच्या मैदानावर बॉलर्ससाठी कर्दनकाळ ठरली होती. मुंबईतील कांगा लीगमध्ये (Kanga League) दोघांनीही सोबत पदार्पण केलं होतं.

  हे वाचा-IND vs SA : वन डे सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज, कुठे पाहाल Live Streaming

  स्कूल क्रिकेटमध्ये सचिनसोबत केली रेकॉर्ड पार्टनरशीप

  कांबळीनं सचिनसह स्कूल क्रिकेटमध्ये (School Cricket) वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) केलेला आहे. तेव्हा तो 17 वर्षांचा होता तर सचिन 16 वर्षांचा होता. शारदाश्रम शाळेकडून (Shardashram School) खेळताना दोघांनी सेंट झेविअरविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 664 रन्सची पार्टनरशीप केली होती. कांबळीनं नॉट आऊट 349 रन्स केले होते. शाळेचे कोच आणि या दोघांचे सर रमाकांत आचरेकरांनी (Ramakant Achrekar) इनिंग डिक्लेअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतरच दोघांच्या बॅट्स शांत झाल्या होत्या. बॅटिंग करताना धुमाकूळ घातल्यानंतर कांबळीनं या मॅचमध्ये बॉलिंगमध्येही चमत्कार केला होता. पहिल्या इनिंगमध्ये त्यानं सेंट झेवियर्सच्या 6 विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर सचिन आणि कांबळी दोघांची नावं चर्चेत आली होती. यानंतर तेंडुलकरनं 1988 मध्ये तर कांबळीनं 1989 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यु केला.

  पहिल्या चार टेस्टमध्ये ठोकल्या दोन डबल सेंच्युरी

  कांबळी हा नॅचरल स्ट्रोक प्लेअर होता. रणजी ट्रॉफीतील पहिल्याच बॉलवर त्यानं सिक्स मारला होता, यावरून त्याच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकतो. दुसरीकडे सचिनही त्याच शैलीत खेळत होता. सचिनला वयाच्या 16व्या वर्षी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टेस्ट डेब्यू करण्याचा चान्स मिळाला. कांबळीला मात्र, पहिली टेस्ट खेळण्यासाठी 1993 पर्यंत वाट पाहावी लागली. त्याने आपल्या पहिल्या सात टेस्ट मॅचेसमध्ये दोन डबल सेंच्युरी आणि दोन सेंच्युरी झळकावल्या. स्पिनर्सविरुद्ध त्याचं फूटवर्क अप्रतिम होतं. एकदा कांबळीने शेन वॉर्नच्या एका ओव्हरमध्ये 22 रन्स ठोकले होते. पण, शॉर्ट बॉल ही त्याची विकनेस होती. ही गोष्ट लक्षात येताच बॉलर्सनं याचा पुरेपुर वापर करून घेतला.

  हे वाचा-BCCI अध्यक्ष पदावरुन पायउतार होणार गांगुली? जय शाह देखील Out होणार का, वाचा इथे

  2 वर्षातच झाला टेस्ट करिअरचा शेवट

  एवढी चांगली सुरुवात होऊनही बेशिस्तपणा आणि रुंद हँडलच्या बॅटच्या आग्रहामुळं कांबळी अडचणीत आला. तो आपल्या बॅटवर एकाच वेळी नऊ ग्रीप लावून खेळत असे. कांबळीबद्दल असं म्हटलं जातं की, अचानक मिळालेलं स्टारडम (Stardom) तो सांभाळू शकला नाही. त्याच्या वाईट सवयी आणि वाईट वागणुकीमुळे परिस्थिती आणखी बिघडत गेली. त्याला पुरेशी संधी मिळाली नाही, असंही झालं नाही. वनडे टीममध्ये त्यानं नऊ वेळा पुनरागमन केलं. पण, वनडेमध्ये चमकरदार कामगिरी करण्यात त्याला यश आलं नाही. शिवाय त्याचं टेस्ट करिअरदेखील (Test Career) दोन वर्षांतच संपुष्टात आलं. 1995 मध्ये तो शेवटची टेस्ट मॅच खेळला होती. ऑक्टोबर 2000 नंतर त्याचं इंडियन वनडे टीममध्ये सिलेक्शन झालं नाही. शेवटी 2009 मध्ये विनोद कांबळीनं इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेन्ट घेतली. त्यानंतर दोन वर्षाचा अंतरानं त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेट देखील सोडलं.

  First published:

  Tags: Sachin tendulakar, Vinod kambli