मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: इंग्लंडला धोक्याचा इशारा, ‘या’ भारतीय बॅट्समननं झळकावलं दुसरं शतक

IND vs ENG: इंग्लंडला धोक्याचा इशारा, ‘या’ भारतीय बॅट्समननं झळकावलं दुसरं शतक

भारतीय टीमच्या (Team India) वन-डे आणि T20 टीमचा नियमित सदस्य श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फॉर्मात आला आहे.

भारतीय टीमच्या (Team India) वन-डे आणि T20 टीमचा नियमित सदस्य श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फॉर्मात आला आहे.

भारतीय टीमच्या (Team India) वन-डे आणि T20 टीमचा नियमित सदस्य श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फॉर्मात आला आहे.

जयपूर, 27 फेब्रुवारी : भारतीय टीमच्या (Team India) वन-डे आणि T20 टीमचा नियमित सदस्य श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फॉर्मात आला आहे. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत श्रेयय मुंबईचा (Mumbai) कॅप्टन आहे. त्यानं या स्पर्धेत दुसरं शतक झळकावलं आहे. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये श्रेयसनं 116 रन काढले. यापूर्वी त्यानं महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 103 रनची खेळी केली होती. श्रेयसनच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे वन-डे मालिकेपूर्वी (ODI Series) इंग्लंडला धोक्याचा इशारा दिला आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पाच मॅचच्या T20 मॅचसासाठी श्रेयसची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. ही मालिका 12 मार्चपासून अहमदाबादमध्ये होणार आहे. श्रेयसच्या शतकाच्या जोरावर मुंबईनं राजस्थान विरुद्ध 50 ओव्हरमध्ये सात आऊट 317 रन काढले. मुंबईकडून यशस्वी जैस्वालनं 38, पृथ्वी शॉ नं 36 तर सूर्यकुमार यादवनं 29 रनचं योगदान दिलं.

श्रेयस अय्यरनं भारताकडून 21 वन-डे मध्ये 44. 83 च्या सरासरीनं 801 रन काढले आहेत. यामध्ये 1 शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्यानं 24 टी-20 मध्ये 130.79 च्या स्ट्राईक रेटनं 328 रन काढले आहेत.

( वाचा : IPL 2021: मुंबईतील सामन्यांना कोरोनाचा धोका, BCCI नं निवडली पाच शहरं )

पृथ्वी शॉ देखील फॉर्मात

श्रेयस अय्यर प्रमाणेच मुंबईचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) देखील या स्पर्धेत फॉर्मात आहे. पृथ्वीनं पदुच्चेरी विरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वीनं फक्त 142 बॉलमध्ये द्विशतक केलं होतं. पृथ्वीनं त्या मॅचमध्ये आक्रमक खेळाचं उदाहरण सादर करत 31 फोर आणि 5 सिक्स लगावले.  पृथ्वी शॉचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून हरपला होता. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) आणि भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो फार कमाल करू शकला नव्हता. या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आलं होतं. या डबल सेंच्युरीनं त्यानं पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतल्याचं दाखवलं आहे. त्याचबरोबर निवड समितीसमोर दावेदारी देखील सादर केली आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, IPL 2021, Mumbai, Shreyas iyer, Sports, Vijay hazare trophy