IPL 2021: मुंबईतील सामन्यांना कोरोनाचा धोका, BCCI नं निवडली पाच शहरं

IPL 2021: मुंबईतील सामन्यांना कोरोनाचा धोका, BCCI नं निवडली पाच शहरं

इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सिझन (IPL 2021) भारतामध्ये आयोजित करण्याची तयारी BCCI नं सुरू केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं बीसीसीआयनं आता प्लॅन B वर विचार सुरु केला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची (COVID-19) संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी निम्मी संख्या महाराष्ट्रामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा फटका मुंबईतील (Mumbai) क्रिकेट फॅन्सना देखील सहन करावा लागणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सिझन (IPL 2021) भारतामध्ये आयोजित करण्याची तयारी BCCI नं सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी मुंबई पहिल्या पंसतीचं शहर होतं. मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) होम ग्राऊंड असलेल्या या शहरात आयपीएलचे जास्तीत जास्त सामने खेळवण्याचा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा (BCCI) विचार होता. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं बीसीसीआयनं आता प्लॅन B वर विचार सुरु केला आहे.

काय आहे प्लॅन B?

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं फक्त मुंबईमध्ये आयपीएलचे सर्व सामने होण्याची शक्यता कमी झालेली आहे. त्यामुळे अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या पाच शहरांमध्ये हे सामने होण्याची शक्यता आहे. यापैकी अहमदाबादमध्ये IPL  ‘प्ले ऑफ’ चे सामने होणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं PTI ला दिलेल्या माहितीनुसार ‘आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास अजून एक महिन्याचा कालावधी आहे. मात्र काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतील. मुंबईत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फक्त मुंबईमध्ये आयपीएलचे सर्व सामने घेणं हे धोकादायक ठरू शकतं. आयपीएल प्ले ऑफ आणि फायनल अहमदाबादमध्ये होण्याची जास्त शक्यता आहे.’

आयपीएल सामन्यांचं वेळापत्रक किमान एक महिना आधी जाहीर करण्याची मागणी काही फ्रँचायझींनी केली होती. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची 8 मार्चला बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे.

( वाचा : IND vs ENG: कोरोनाचा क्रिकेटला पुन्हा फटका, पुण्यातील वन-डे मालिका धोक्यात! )

निवडणूक आयोगानं एक दिवसापूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. तामिळनाडूत 2 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान आहे. तसंच बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान होणार आहे. आयपीएलचं वेळापत्रक ठरवताना शहरातील मतदान आणि आयपीएल सामना एकाच दिवशी येणार नाही, याची खबरदारी देखील बीसीसीआयला घ्यावी लागणार आहे.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 1:26 PM IST

ताज्या बातम्या