सुरत, 26 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट टीममधील (Team India) जागेसाठीची स्पर्धा रोज आणखी तीव्र होत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नवोदीत खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारताकडे पर्यायी खेळाडूंची फळी (Bench Strength) असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत टीम इंडियातून खराब फॉर्ममुळे वगळण्यात आलेले खेळाडू चांगला खेळ करत आहेत.
मुंबईकर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) गुरुवारी 227 रनची खेळी केली होती. त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल पांड्याने (Krunal Pandya) शतक झळकावलं आहे. कृणालने बडोद्याकडून खेळताना छत्तीसगड विरुद्ध 82 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे त्याचं या स्पर्धेतील दुसरं शतक आहे. टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या कृणालला या स्पर्धेत चांगलाच फॉर्म गवसला आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत दोन शतक आणि दोन अर्धशतक झळकावले आहेत.
बडोद्याचा कॅप्टन असलेल्या कृणालने 100 बॉलमध्ये नाबाद 133 रन केले. यामध्ये 20 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे. कृणालला विष्णू सोळंकीने चांगली साथ दिली. त्याने 78 रन काढले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर बडोद्याने छत्तीसगड विरुद्ध विजयासाठी 333 रनचं टार्गेट ठेवलं आहे.
Krunal Pandya in this Vijay Hazare Trophy 2021:-
71(77).
127*(97).
55(50).
133*(100).
4 Innings, 386 Runs, 193.0 Ave, 2 Hundreds. Exceptional from Krunal Pandya. #VijayHazareTrophy
— CricketMAN2 (@man4_cricket) February 26, 2021
वन-डे टीमसाठी दावेदार
कृणाल पांड्यानं या स्पर्धेत त्रिपुरा विरुद्धही शतक झळकावलं होतं. त्रिपुराविरुद्ध त्यानं 97 बॉलमध्ये नाबाद 127 रन केले. कृणालच्या या खेळीमध्ये 20 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. मॅचमध्ये त्रिपुराने पहिले बॅटिंग करत 7 विकेट गमावून 302 रन केले होते. कृणालच्या शतकाच्या जोरावर बडोद्याने हे आव्हान एक विकेट राखून पूर्ण केले.
(वाचा : टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉ ची डबल सेंच्युरी; 31 फोर, 5 सिक्सचा वर्षाव )
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. विजय हजारे स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत कृणालनं वन-डे टीममधील जागेसाठी दावेदारी सादर केली आहे.