टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉ ची डबल सेंच्युरी; 31 फोर, 5 सिक्सचा वर्षाव

टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉ ची डबल सेंच्युरी; 31 फोर, 5 सिक्सचा वर्षाव

मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत डबल सेंच्युरी झळकावली आहे. या डबल सेंच्युरीनं त्यानं पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतल्याचं दाखवलं आहे. त्याचबरोबर निवड समितीसमोर दावेदारी देखील सादर केली आहे.

  • Share this:

जयपूर, 25 फेब्रुवारी:  मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy)  स्पर्धेत डबल सेंच्युरी झळकावली आहे. जयपूरमध्ये सुरु असलेल्या पदुच्चेरी विरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वीनं फक्त 142 बॉलमध्ये डबल सेंच्युरी पूर्ण केली. पृथ्वीनं यामध्ये आक्रमक खेळाचं उदाहरण सादर करत 31 फोर आणि 5 सिक्स लगावले.  पृथ्वी शॉचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून हरपला होता. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) आणि भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो फार कमाल करू शकला नव्हता. या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आलं होतं. या डबल सेंच्युरीनं त्यानं पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतल्याचं दाखवलं आहे. त्याचबरोबर निवड समितीसमोर दावेदारी देखील सादर केली आहे. पृथ्वी शॉ च्या आक्रमक खेळामुळे मुंबईनं 4 आऊट 457 असा विशाल स्कोअर केला. पृथ्वी 227 रन काढून नाबाद राहिला.

पृथ्वी या मॅचमध्ये सुरुवातीपासूनच रंगात होता. त्यानं फक्क 65 बॉलमध्ये शतक झळकावलं. या खेळीच्या दरम्यान त्यानं हवेतून फटेबाजी करणे टाळले. त्यानं जास्तीत जास्त फोर लगावत वेगानं रन जमवले.

मुंबईचा अनुभवी बॅट्समन सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) त्याला चांगली साथ दिली. सूर्यकुमारची टीम इंडियामध्ये नुकतीच निवड झाली आहे. तो आनंद त्यानं सेंच्युरी झळकावून पूर्ण केला. सूर्यकुमारनं फक्त 58 बॉलमध्ये 22 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 133 रन केले.

दिल्लीविरुद्धही झळकावलं होतं शतक

पृथ्वी शॉ नं विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या मॅचमध्ये दिल्ली विरुद्धही शतक झळकावले होते.दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत पृथ्वीनं 89 बॉलमध्ये 15 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 105 रन केले. त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबईनं दिल्लीनं दिलेलं 212 रनचं आव्हान 32 व्या ओव्हरमध्ये आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं  होतं.

विशेष म्हणजे दिल्लीविरुद्धही पृथ्वीची सूर्यकुमार यादव सोबतच जोडी जमली होती. पृथ्वी शॉ ने 83 बॉलमध्ये शतक झळकावलं. तर सूर्यकुमारनं 32 बॉलमध्येच सहा फोर आणि दोन सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं होतं.

Published by: News18 Desk
First published: February 25, 2021, 1:06 PM IST

ताज्या बातम्या