मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीच्या शिष्याचा 'डबल धमाका', 24 तासांत ठोकले दुसरे शतक! रोहित देणार दक्षिण आफ्रिकेत संधी

धोनीच्या शिष्याचा 'डबल धमाका', 24 तासांत ठोकले दुसरे शतक! रोहित देणार दक्षिण आफ्रिकेत संधी

महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) शिष्य ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 24 तासांत दुसरे शतक झळकावत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या वन-डे टीमसाठी दावेदारी सादर केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 डिसेंबर : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमने यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेचं (IPL 2021) विजेतेपद पटकावले. या विजेतेपदामध्ये पुणेकर ऋतुराज गायकवाडचे (Ruturaj Gaikwad)  प्रमुख योगदान होते. धोनीने या योगदानाची दखल घेत त्याला पुढील सिझनसाठी रिटेन केले आहे. ऋतुराजनेही धोनीचा विश्वास सार्थ ठरवत त्याचा जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आहे.

विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) ऋतुराज महाराष्ट्राच्या टीमचा कॅप्टन आहे. या स्पर्धेत त्याने सलग दुसऱ्या दिवशी शतक झळकावले आहे. ऋतुराजने गुरुवारी छत्तीसगड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये  143 बॉलमध्ये नाबाद 154 रनची खेळी केली. या खेळीच्या दरम्यान त्याने 14 फोर आणि 5 सिक्स लगावले. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ही मॅच 8 विकेट्सनं दणदणीत जिंकली. ऋतुराजला यश नाहरनं 52 रन काढत चांगली साथ दिली.

छत्तीसगडने पहिल्यांदा बॅटींग करत 50 ओव्हर्समध्ये 7 आऊट 275 रन केले होते. 276 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना ऋतुराजने 105 बॉलमध्येच शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याचा आक्रमक खेळ सुरू होता. ऋतुराजच्या फटकेबाजीमुळे महाराष्ट्राने 47 व्या ओव्हर्समध्येच विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने एक दिवसापूर्वीच मध्य प्रदेश विरुद्ध 112 बॉलमध्ये 136 रनची खेळी केली होती. ऋतुराज कॅप्टन म्हणूनही या स्पर्धेत यशस्वी ठरत आहे.महाराष्ट्र क्रिकेट टीमने  त्याच्या कॅप्टनसीमध्ये सलग दोन मॅच जिंकत स्पर्धेची सुरूवात दमदार केली आहे.

रोहित शर्माने कॅप्टन होताच सांगितलं ICC स्पर्धेतील पराभवाचं समान कारण!

रोहित शर्मा देणार संधी!

ऋतुराज गायकवाडसाठी 2021 हे वर्ष यशस्वी ठरले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त 636 रन करत ऑरेंज कॅप पटकावली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 5 मॅचमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 259 रन केले. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सलग 2 शतक झळकावत त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. या जबरदस्त फॉर्ममुळे ऋतुराजने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन-डे टीमसाठी दावेदारी सादर केली आहे. नवा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) त्याच्या नावाचा निवड समितीकडे आग्रह करण्याची दाट शक्यता आहे.

First published:

Tags: Cricket, Team india