मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जयसूर्या आणि कालुवितरणाची जोडी टीम इंडियाकडून खेळणार , वर्ल्ड कपमध्ये करणार धमाल

जयसूर्या आणि कालुवितरणाची जोडी टीम इंडियाकडून खेळणार , वर्ल्ड कपमध्ये करणार धमाल

श्रीलंकेला 1996 साली वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि रोमेश कालुवितरणा (Romesh Kaluwitharana) यांचे प्रमुख योगदान होते. टीम इंडियाला देखील तशी जोडी मिळाली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 डिसेंबर :श्रीलंकेला 1996 साली वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि रोमेश कालुवितरणा (Romesh Kaluwitharana) यांचे प्रमुख योगदान होते. या जोडीने वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्या 15 ओव्हर्समध्ये बॅटींग करण्याची संपूर्ण पद्धतच बदलून टाकली. त्यांच्या आक्रमक खेळाचा वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेला मोठा फायदा झाला. आता टीम इंडियाला देखील जयसूर्या-कालुवितरणा जोडी मिळाली आहे. जी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत बॅटनं धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीत जयसूर्या आहे 18 वर्षांचा सिद्धार्थ यादव तर कालुवितरणा म्हणून निवड समितीनं 17 वर्षांचा विकेटकिपर-बॅटर आराध्य यादवची निवड केली आहे. हे दोघेही गाझियाबाद या एकाच शहरातील असून अजय शर्मा या एकाच कोचच्या हाताखाली त्यांनी क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आहे. तसंच सर्व काही मनासारखं घडलं तर ही जोडी 1996 वर्ल्ड कपमधील जयसूर्या-कालुवितरणा प्रमाणे कमाल करू शकते. सिद्धार्थची अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये निवड होण्यात आराध्यच्या वडिलांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. सिद्धार्थचे वडील श्रवण यादव यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी मी अंडर 16 ट्रायलच्या दरम्यान आराध्यचे वडील अजय यादव यांना भेटलो. त्यांनीच सिद्धार्थसाठी चांगला कोच निवडण्यात माझी मदत केली. सिद्धार्थला माजी क्रिकेटपटू अजय शर्मा यांच्या कोचिंग अकादमीमध्ये  पाठवण्याचा सल्ला त्यांनी दिला. यादव यांचा हा सल्ला सिद्धार्थच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला.' असे श्रवण यांनी सांगितले. Pro Kabaddi League : आजपासून प्रो कबड्डीचा थरार, वाचा स्पर्धेतील सर्व महत्त्वाचे नियम आराध्य यापूर्वी अंडर 14 स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळला आहे. त्याला मोठ्या भावापासून क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. अजय शर्मा यांनी 2016 साली गाझियाबादमध्ये क्रिकेट अकादमी सुरू केली. त्यानंतर या दोघांचा अंडर 19 वर्ल्ड कपच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. आराध्य यापूर्वी ऑल राऊंडर होता. पण महेंद्रसिंह धोनीचा खेळ पाहून तो विकेट किपर बनला.
First published:

Tags: Cricket, Cricket news

पुढील बातम्या