जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / U19 World Cup, IND vs BAN: 2 वर्षांनी काढला पराभवाचा वचपा, टीम इंडियाच्या विजयाची 5 कारणं

U19 World Cup, IND vs BAN: 2 वर्षांनी काढला पराभवाचा वचपा, टीम इंडियाच्या विजयाची 5 कारणं

U19 World Cup, IND vs BAN: 2 वर्षांनी काढला पराभवाचा वचपा, टीम इंडियाच्या विजयाची 5 कारणं

टीम इंडियानं अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (Under-19 World Cup) सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतानं क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा 5 विकेट्सनं पराभव केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : टीम इंडियानं अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या  (Under-19 World Cup) सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतानं क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा 5 विकेट्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच 2 वर्षापूर्वी या स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा टीम इंडियानं वचपा काढला आहे. भारतीय टीमनं प्रत्येक क्षेत्रात गतविजेत्यांवर मात करत मोठ्या दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयाची 5 प्रमुख कारणं काय आहे ते पाहूया पहिलं कारण : टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा कॅप्टन यश ढूलचा (Yash Dhull) निर्णय भारतीय बॉलर्सनं योग्य ठरवला. त्यांनी पिचचा पूर्ण फायदा उठवला. रवी कुमारनं (Ravi Kumar) पहिल्या 8 ओव्हर्समध्येच 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे बांगलादेशला चांगली सुरूवात करता आली नाही. दुसरं कारण : भारतीय बॉलर्सनी मिडल ओव्हर्समध्ये पकड कायम ठेवली. 20 ओव्हरनंतरही बांगलादेशच्या टीमनं 50 रन केले नव्हते. यश ढूलनं चांगली कॅप्टनसी केली. त्याने बॉलिंगमध्ये योग्य बदल करत दबाव कायम ठेवला. तिसरं कारण : बांगालदेशनं आठव्या विकेटसाठी 50 रन जोडले. त्यावेळी पार्ट टाईम स्पिनर अंगक्रिश रघुवंशी  (Angkrish Raghuvanshi) याने टीमला मोठं यश मिळवून दिलं. बांगलादेशच्या शेवटच्या 3 विकेट्स फक्त 5 रनवर गेल्या. 150 रनचा टप्पा गाठण्याचे त्यांचे ध्येय यशस्वी झाले नाही. IND vs WI : वेस्ट इंडिजच्या T20 टीमची घोषणा, 3 IPL स्टार्सना वगळले  चौथं कारण : टीम इंडियाची सुरूवात खराब झाली होती. हरनूर सिंह शून्यावर आऊट झाला. त्यानंतर अंगक्रिश आणि शेख रशिदनं 70 रनची भागिदारी करत भारतीय इनिंग सावरली. या दोघांनी बांगलादेशच्या बॉलिंगचा शांतपणे सामना केला. पाचवं कारण : टीम इंडियानं 8 बॉलमध्ये अंगक्रिश रघुवंशी आणि शेख रशिदची विकेट गमावली. त्यावेळी कोरोनानंतर टीममध्ये परतलेल्या कॅप्टन यश ढूलनं एक बाजू खंबीरपणे लावून धरत विजयावर शिक्कामोर्तब केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात