मुंबई, 29 जानेवारी : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेवर (Under-19 World Cup 2022) कोरोनाचा अटॅक झाला आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका टीममधील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. कॅनडा टीमचे 9 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे प्लेट ग्रुपच्या 2 मॅच रद्द कराव्या लागल्या आहेत. कॅनडाकडं Playing 11 मध्ये खेळवण्यासाठी पुरेसे खेळाडू नव्हते. त्यामुळे त्यांची स्कॉटलंड विरूद्धची मॅच रद्द करण्यात आली. 29 जानेवारी रोजी ही मॅच होणार होती. त्याचबरोबर युगांडा विरूद्ध पीएनजी यांच्यातील विजेत्या टीमविरूद्ध होणारी कॅनडाची मॅच देखील रद्द करण्यात आली आहे. आता आयसीसीच्या नियमानुसार स्कॉटलंडच्या टीमला चांगल्या रनरेटच्या आधारावर 13 व्या आणि 14 व्या क्रमांकाच्या प्ले ऑफ साठी क्वालिफाय असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तर 15 आणि 16 नंबरसाठी प्ले ऑफचा सामना होणार नाही. यामध्ये युगांडा विरूद्ध पीएनजी टीममधील विजयी टीमचा कॅनडाशी सामना होणार होता. पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात अंडर 19 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 119 रननं मोठा पराभव केला. दोन्ही टीममध्ये झालेल्या शेवटच्या पाच सामन्यात पाकिस्ताननं बाजी मारली होती. पण, यंदा ऑस्ट्रेलियानं ही परंपरा तोडत पाकिस्तानला धूळ चारली.
A comprehensive victory for Australia!
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 28, 2022
They are now into the semi-finals of the Super League stage with a 119-run win over Pakistan 🌟#PAKvAUS | #U19CWC pic.twitter.com/c5fnjVhoAZ
ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 7 आऊट 276 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून ओपनर टेग विलीनं सर्वात जास्त 71 रन केले. तर कोरे मिलरनं 75 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. मिलरनं 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. पाकिस्तानला मॅच जिंकण्यासाठी 277 रनचं अवघड आव्हान होतं. BBL Final मध्ये टीम गोत्यात, कोचलाच खेळवण्याची नामुष्की पाकिस्तानची टीम हे आव्हान पेलू शकली नाही. त्यांची टीम फक्त 35.1 ओव्हर्समध्ये 157 रनवर ऑल आऊट झाली. आता सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्या टीमशी होणार आहे.