मुंबई, 28 जानेवारी : ऑस्ट्रेलियाची स्थानिक टी-20 स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीग 2022 (Big Bash League 2022) मध्ये पर्थ स्कॉचर्स चॅम्पियन झाली आहे. पर्थने फायनलमध्ये तीन वेळची विजेता टीम असलेल्या सिडनी सिक्सर्सचा (Perth Scorchers vs Sydney Sixers) 79 रननी पराभव केला. बिग बॅश लीगचा हा 11 वा मोसम होता. या मोसमात विजय मिळवत पर्थने इतिहास घडवला. पर्थ स्कॉचर्सने सर्वाधिक 4 वेळा हा बिग बॅश लीगची ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यातल्या विजयासोबतच त्यांनी तीन वेळा ट्रॉफी जिंकलेल्या सिडनी सिक्सर्सना मागे टाकलं आहे. या दोघांशिवाय मेलबर्न रेनेगेड्स, ऍडलेड स्ट्रायकर्स, सिडनी थंडर्स आणि ब्रिस्बेन हिट्स यांनी प्रत्येकी 1-1 वेळी स्पर्धा जिंकली. BBL Final जिंकल्याचं जीवघेणं सेलिब्रेशन, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नाका तोंडातून रक्त, Shocking VIDEO कोच घेऊन खेळण्याची नामुष्की मॅचमध्ये टॉस हरल्यानंतर पर्थ स्कॉचर्सने पहिले बॅटिंग करत 6 विकेट गमावून 171 रन केले. लॉरी इव्हान्सने नाबाद 76 रनची खेळी केली. कर्णधार एश्टन टर्नरने 54 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा 16.2 ओव्हरमध्ये 92 रनवर ऑल आऊट झाला. कोरोना आणि दुखापतीमुळे सिडनीच्या टीममध्ये 11 खेळाडूही नव्हते, त्यामुळे टीमला सेमी फायनल आणि फायनलमध्ये असिस्टंट कोच जय लेंटनला घेऊन खेळावं लागलं.
Jay Lenton is everywhere right now! #BBL11 pic.twitter.com/uVyHASRSTs
— KFC Big Bash League (@BBL) January 28, 2022
सिडनीचे असिस्टंट कोच जय लेंटन यांनी दोन्ही सामन्यांमध्ये विकेट कीपिंग केली. फायनलमध्ये तर त्यांनी सुरूवातीलाच दोन कॅच पकडले, यानंतर उडी मारून तिसरा कॅच पकडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण यात त्यांना यश आलं नाही.