मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

U19 आशिया कपला कोरोनाचा फटका, 32 ओव्हर्सनंतर मॅच रद्द करण्याची आली वेळ

U19 आशिया कपला कोरोनाचा फटका, 32 ओव्हर्सनंतर मॅच रद्द करण्याची आली वेळ

यूएईमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 आशिया कप  (Under-19 Asia Cup) स्पर्धेत कोरोनाची एन्ट्री झाली आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) यांच्यातील मॅचला कोरोनाचा फटका बसला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 डिसेंबर : यूएईमध्ये सुरू असलेल्या अंडर 19 आशिया कप  (Under-19 Asia Cup) स्पर्धेत कोरोनाची एन्ट्री झाली आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) यांच्यात मंगळवारी सुरु असलेल्या या मॅचला कोरोनाचा फटका बसला. या मॅचमध्ये 32.4 ओव्हर्सचा खेळ झाला होता. त्यानंतर दोन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे उर्वरित मॅच रद्द करण्यात आली. आता या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये भारताची लढत बांगलादेशशी  (India vs Bangladesh) होणार आहे.

एशिया क्रिकेट परिषदेनं (ACC) या विषयावर वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 'एशिया क्रिकेट परिषद आणि अमिरात क्रिकेट बोर्डानं आज (मंगळवार) खेळला जात असलेला ग्रुप बी मधील शेवटचा सामना रद्द केला आहे. या स्पर्धेतील 2 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर स्पर्धेतील नियमानुसार उपचार सुरू आहेत. या मॅचशी संबंधित अन्य सर्व अधिकाऱ्यांचे परीक्षण करण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय येईपर्यंत ते आयसोलेशनमध्ये राहतील.'

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. मॅच रद्द होईपर्यंत बांगलादेशनं 32.4 ओव्हर्समध्ये 4 आऊट 130 रन काढले होते. खेळ रद्द झाला त्यावेळी आरिफुल इस्लाम 19 आणि मोहम्मद फहीम 27 रन काढून खेळत होते.

ICC Test Player Of The Year : आयसीसीच्या यादीवर पाकिस्तानात नाराजी, जाणून घ्या कारण

बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही टीमनं यापूर्वीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. या ग्रुपच्या विजेत्याचा निर्णय मंगळवारच्या मॅचमध्ये होणार होता. अखेर मॅच रद्द झाल्यानं बांगलादेशनं चांगल्या रनरेटच्या आधारावर ग्रुपमध्ये पहिला क्रमांक पटकावला. सेमी फायनलमध्ये त्यांची लढत भारताशी (India vs Bangladesh) होणार आहे. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकेची लढत पाकिस्तानशी (Sri Lanka vs Pakistan) होईल. दोन्ही सेमी फायनल 30 डिसेंबर रोजी खेळल्या जाणार आहेत.

First published:

Tags: Bangladesh, Covid-19, Cricket news, Sri lanka