मुंबई, 29 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं (ICC) नं मंगळवारी टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंसाठी नामांकनं (Nominations) जाहीर केली आहेत. आयसीसीनं जाहीर केलेल्या नामांकनाच्या यादीत 4 खेळाडूंचा समावेश आहे. ही यादी जाहीर होताच पाकिस्तानात नाराजीचं वातावरण आहे. कारण, आयसीसीनं शॉर्टलिस्ट केलेल्या यादीत पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही. या यादीवर पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार तसेच फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय ऑफ स्पिनर आर. अश्विन, इंग्लंडचा कॅप्टन जो रूट, न्यूझीलंडचा फास्ट बॉलर काईल जेमीसन आणि श्रीलंकेचा दिमूथ करूणारत्ने यांचा या यादीमध्ये समावेश आहे. मात्र यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये जोरदार बॉलिंग केलेले शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि हसन अली (Hasan Ali) यांना नामांकन मिळालेलं नाही. 2021 या वर्षात आर. अश्विननंतर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स (47) घेणाऱ्या शाहीन आफ्रिदीचं नाव नसल्यानं धक्का बसला आहे, असे मत पाकिस्तानचे वरीष्ठ क्रीडा पत्रकार साज सादीक यांनी ट्विट करत व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे आणखी एक क्रीडा पत्रकार अर्शलान सिद्धीकी यांनीही आयसीसीला प्रश्न विचारला आहे.
4 nominees for ICC Test player of the year - Joe Root, Ravichandran Ashwin, Kyle Jamieson and Dimuth Karunaratne. Surprised that Shaheen Shah Afridi who took 47 wickets (2nd highest) at an average of 17.06 isn't included #Cricket
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) December 28, 2021
Four nominees for ICC Test player award 2021
— Arsalan Siddique (@Arsalansidique1) December 28, 2021
1 Joe Root
2 Ravi Ashwin
3 Jamieson
4 Karunaratne
Shaheen Shah has been phenomenal this year, in 9 matches managed to take 47 wicket Also he's 2nd most wicket taker this year after Ashwin and not even nominees, SHOCKING #Cricket
शाहीन आफ्रिदीनं 2021 मध्ये जबरदस्त बॉलिंग केली. 9 टेस्टमध्ये 47 विकेट्स घेतल्या. तो अश्विननंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर आहे. तरीही तो आयसीसीला नॉमिनेशनसाठी योग्य वाटला नाही. ही खरंच धक्कादायक बाब आहे, असे ट्टिट सिद्दीकी यांनी केले आहे. IND vs SA 1st Test : एकाच दिवशी पडल्या 18 विकेट, सेंच्युरियन टेस्ट रोमांचक अवस्थेत कशी आहे अश्विनची कामगिरी अश्विनने या वर्षी 8 टेस्ट मॅचमध्ये 16 च्या सरासरीने 52 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 28 च्या सरासरीने 337 रनही केल्या, यात एका शतकाचा समावेश आहे. अश्विनने वर्षाच्या सुरुवातीला सिडनी टेस्टमध्ये हनुमा विहारीसोबत नाबाद पार्टनरशीप करत भारताचा पराभव टाळला होता. या कारणामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज 2-1 ने जिंकली होती. अश्विनने 128 बॉलमध्ये नाबाद 29 रन केले होते. तर इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या सीरिजमध्ये अश्विनला 32 विकेट मिळाल्या होत्या, तसंच त्याने 189 रनही केल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजच्या 2 सामन्यांमध्ये त्याने 14 विकेट पटकावल्या.

)







