जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा कहर! 40 बॉलमध्ये लगावले 10 सिक्स, 3 फोर

राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा कहर! 40 बॉलमध्ये लगावले 10 सिक्स, 3 फोर

राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा कहर! 40 बॉलमध्ये लगावले 10 सिक्स, 3 फोर

आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी (RR) चांगली बातमी आहे. राजस्थानच्या खेळाडूनं द हंड्रेड (The Hundred) स्पर्धेत 10 सिक्स आणि 3 फोरची आक्रमक खेळी केली आहे. त्याचबरोबर त्यानं 3 विकेट्सही घेतल्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी (RR) चांगली बातमी आहे. राजस्थानच्या टीममधील इंग्लिश बॅट्समन लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.  इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत त्यानं बॅट आणि बॉल या दोन्ही प्रकारात कमाल केली. त्याच्या ऑल राऊंड खेळामुळे बर्मिंगहॅम फिनिक्सनं (Birmingham Phoenix) स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. लिविंगस्टोननं फक्त 40 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 3 फोर लागावत नाबाद 92 रनची खेळी केली. कॅप्टनसीला साजेशा त्याच्या या खेळीमुळे बर्मिंगहमनं ही मॅच 26 बॉल राखत आरामात जिंकली. आता ही टीम शनिवारी लॉर्ड्सवर फायनल खेळणार आहे. ‘द हंड्रेड’ च्या या मॅचमध्ये बर्मिंगहमनं पहिल्यांदा फिल्डिंग घेतली होती. त्यांना ग्रुप स्टेजमध्येमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी ही मॅच जिंकणे किंवा टाय करणे आवश्यक होते. नॉर्दन सुपरचार्जर्सनं  (Northern Super Chargers) जोरदार सुरूवात केली. ख्रिस लीन (Chris Lynn) आणि टॉम कोहलर यांनी 95 रनची ओपनिंग पार्टरनशिप केली. कोहलरनं फक्त 25 बॉलमध्ये 65 रन काढले. सुपरचार्जर्स मोठा स्कोअर करणार असं वाटत असतानाच कॅप्टन लिविंगस्टोन, लेग स्पिनर इम्रान ताहीर आणि बेनी होवेल यांनी त्यांना लगाम घातला. या तिघांनी पुढच्या 60 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या. एडम मिल्नेनं शेवटच्या टप्प्यात अचूक बॉलिंग केली. त्यामुळे सुपरचार्जर्सला 143 रन्सच करता आले. लिविंगस्टोननं 3 विकेट्स घेतल्या. सर्वात वेगवान अर्धशतक लिविंगस्टोननं बॉलिंगनंतर बॅटींगमध्येही कमाल केली. त्यानं तिसऱ्या नंबरवर बॅटींगवर उतरत फक्त 20 बॉलमध्ये या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही त्याची फटकेबाजी सुरू होती. त्यानं 40 बॉलमध्ये 92 रनची खेळी केली. यावेळी त्यानं 10 सिक्स आणि 3 फोर लगावले. या स्पर्धेत एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्डही त्यानं यावेळी केला.

जाहिरात

IND vs ENG: पराभूत इंग्लंडला बेन स्टोक्स सावरणार? हेड कोचचं मोठं वक्तव्य लिविंगस्टोनला ओपनर फिन ऐलेननं चांगली साथ दिली. त्याने 26 बॉलमध्ये 42 रनची खेळी केली. या दोघांनी 51 बॉलमध्ये 106 रनची पार्टनरशिप केली. त्यामुळे बर्मिंगहमनं ही मॅच 8 विकेट्सनं जिंकत मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात