जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: पराभूत इंग्लंडला बेन स्टोक्स सावरणार? हेड कोचचं मोठं वक्तव्य

IND vs ENG: पराभूत इंग्लंडला बेन स्टोक्स सावरणार? हेड कोचचं मोठं वक्तव्य

IND vs ENG: पराभूत इंग्लंडला बेन स्टोक्स सावरणार? हेड कोचचं मोठं वक्तव्य

लॉर्ड्स टेस्टमधील (India vs England, 2nd Test) मोठ्या पराभवानंतर इंग्लंडची टीम दबावात आहे. या टीमला सावरण्यासाठा बेन स्टोक्सला (Ben Stokes) तिसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याची सूचना केली जाऊ शकते, असं वृत्त आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टमधील  (India vs England, 2nd Test) मोठ्या पराभवानंतर इंग्लंडची टीम दबावात आहे. या टीमला सावरण्यासाठा बेन स्टोक्सला (Ben Stokes) तिसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याची सूचना केली जाऊ शकते, असं वृत्त आहे. स्टोक्सनं मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. स्टोक्सच्या समावेशाबाबत इंग्लंडचे हेड कोच ख्रिस सिल्वरवूड  (Chris Silverwood) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारताविरुद्ध सीरिजमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही आपण स्टोक्सवर पुनरागमनासाठी कोणताही दबाव टाकणार नाही.  स्टोक्सला सावरण्यासाठी जितका  वेळ हवा आहे, तितका दिला जाईल. असं सिल्वरवूड यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) यानेही  टेस्ट सीरिजपूर्वी हेच सांगितलं होतं. सिल्वरवूड यांनी सांगितले की, ‘माझ्या मते आम्हाला स्टोक्सच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करावी लागेल. या विषयावर त्याच्यावर दबाव टाकणे योग्य नाही. तो स्वत: खेळण्यासाठी सज्ज आहे हे सांगेपर्यंत वाट पाहण्याची आमची तयारी आहे.‘स्टोक्सनं पाकिस्तान विरुद्धची वन-डे मालिका 3-0 नं जिंकल्यानंतर क्रिकेटमधून अनिश्चित ब्रेक घेतला होता. मानसिक आरोग्य सारख्या संवेदनशील प्रकरणात बरं होण्यासाठी निश्चित कालावधी नसतो, या रूटच्या वक्तव्याला सिल्वरवूड यांनी पाठिंबा दिला. ‘या बाबतीमध्ये कोणताही निश्चित कालावधी नाही. मी पुन्हा सांगतो, आमच्यासाठी स्टोक्स आणि त्याचा परिवार निरोगी राहणे आवश्यक आहे. त्यानंतरच तो दमदार पुनरागमन करेल.’ असं ते म्हणाले. IND VS ENG: इंग्लंडचा फास्ट बॉलर जखमी, ‘या’ 2 जणांचा होणार 3 वर्षांनी समावेश! इंग्लंड तिसऱ्या टेस्टसाठी बुधवारी टीम जाहीर करण्याची शक्यता आहे. या टेस्टमध्ये फास्ट बॉलर मार्क वूडचे खेळणे अनिश्चित आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये फिल्डिंग करताना तो जखमी झाला होता. तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेमध्ये सुरू होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात