मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /U-19 World Cup : मुलासाठी वडिलांनी नोकरी सोडली, पाहा कोण आहे भारताचा कॅप्टन यश ढूल?

U-19 World Cup : मुलासाठी वडिलांनी नोकरी सोडली, पाहा कोण आहे भारताचा कॅप्टन यश ढूल?

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Under 19 World Cup) भारतीय टीमची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. चारवेळची चॅम्पियन असलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व दिल्लीच्या यश ढूल (Yash Dhull) याला देण्यात आलं आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Under 19 World Cup) भारतीय टीमची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. चारवेळची चॅम्पियन असलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व दिल्लीच्या यश ढूल (Yash Dhull) याला देण्यात आलं आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Under 19 World Cup) भारतीय टीमची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. चारवेळची चॅम्पियन असलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व दिल्लीच्या यश ढूल (Yash Dhull) याला देण्यात आलं आहे.

मुंबई, 19 डिसेंबर : अंडर-19 वर्ल्ड कपसाठी (Under 19 World Cup) भारतीय टीमची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. चारवेळची चॅम्पियन असलेल्या भारतीय टीमचं नेतृत्व दिल्लीच्या यश ढूल (Yash Dhull) याला देण्यात आलं आहे. पुढच्या वर्षी 14 जानेवारीपासून अंडर-19 वर्ल्ड कपला वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीला वर्ल्ड कपची फायनल होईल.

विनू मंकड ट्रॉफीचा 2021-22 मोसम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात आला. या स्पर्धेमध्ये यश ढूलने सर्वाधिक रन केल्या. दिल्लीसाठी त्याने 5 सामन्यांमध्ये 75.50 च्या सरासरीने 302 रन केले. दिल्लीच्या जनकपुरीचा रहिवासी असलेल्या यशने अंडर-16, अंडर-19 टीमचं तसंच भारत एच्या अंडर-19 टीमचंही नेतृत्व केलं आहे. मधल्या फळीतला बॅटर असलेला यश वयाच्या 11व्या वर्षी बाल भवन स्कूल अकादमीमध्ये आला, यानंतर त्याचा खेळ सुधारला.

यशचे वडील एका सौंदर्यप्रसाधनाच्या कंपनीमध्ये काम करत होते, पण मुलाच्या करियरसाठी त्यांनी नोकरी सोडली. 'लहानपणापासूनच त्याला खेळण्यासाठी चांगली किट आणि इतर गोष्टी मिळाल्या पाहिजेत, याची दखल मी घेतली. मी त्याला सर्वोत्तम इंग्लिश लाकूड असलेली बॅट दिली. त्याच्याकडे फक्त एकच बॅट नव्हती, मी यामध्ये बदल करत गेलो. आम्ही आमचे खर्चही कमी केले. माझे वडील लष्करात काम करणारे होते, त्यांच्या पेन्शनमधून आम्ही घर चालवायचो. एवढ्या कमी खर्चात आम्ही घर कसं चालवतो, याचं यशला आश्चर्य वाटायचं,' असं यशच्या वडिलांनी सांगितलं.

दरम्यान यशला तुझा रोल मॉडेल कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून शिकण्यासारखं आहे. मी सगळ्यांचा खेळ बघतो, कोणालाच कॉपी करत नाही, पण प्रत्येक जण माझा हिरो आहे,' अशी प्रतिक्रिया यशने दिली.

अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

यश ढूल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्य यादव (विकेटकीपर), राज अंगद बाव, मानव पारखी, कौशल तांबे, आरएस हैंगरगेकर, वासू वत्सो, विक्की ओस्तवाल, रवी कुमार आणि गर्व सांगवान

First published:
top videos