मुंबई, 20 डिसेंबर : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीनं केलेल्या वक्तव्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. यापूर्वी विराटनं त्याच्या टीकाकारांना बॅटनं उत्तर दिलं आहे. आता विराटला पुन्हा एकदा तशी संधी आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) टेस्ट सीरिज 26 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. विराटनं या सीरिजमध्ये त्याच्या क्षमतेनुसार खेळ केला तर टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांना मागे टाकू शकतो. टीम इंडियानं आजवर दक्षिण आफ्रिकेत एकदाही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा ही परंपरा मोडण्यासाठी विराटला आघाडीवर राहून खेळ करावा लागेल. विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 टेस्टमध्ये 59.72 च्या सरासरीनं 1075 रन काढले आहेत. विराटपेक्षा फक्त तीन भारतीयांनी आफ्रिकेच्या विरुद्ध जास्त रन केले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 1741 रनसह नंबर 1 वर आहे. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग (1306) आणि राहुल द्रविड (1252) यांचा क्रमांक आहे. विराटनं आगामी टेस्ट सीरिजमध्ये 232 रन केले तर तो सेहवाग आणि द्रविडला मागे टाकू शकतो. फक्त सरासरीचा विचार केला तर विराट कोहली हा दक्षिण आफ्रिकेतील सर्वात यशस्वी भारतीय बॅटर आहे. त्याने जवळपास 60 च्या सरासरीनं रन केले आहेत. धोनी आणि साक्षीनं केली लग्नात धमाल, पाहा दोघांचे सुंदर Photos अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे टीम इंडियाचे आणखी दोन अनुभवी खेळाडू या टेस्टमध्ये खेळणार आहेत. पण त्यांचा या यादीत क्रमांक बराच खाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध पुजारानं 758 तर रहाणेनं 748 रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







