• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • रोहित शर्मामुळे विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूचं करिअर समाप्त

रोहित शर्मामुळे विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूचं करिअर समाप्त

रोहित शर्मा टेस्टमध्ये ओपनर म्हणून स्थिर झाल्यानं काही खेळाडूंचं करिअर धोक्यात आलं. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) मित्राचं करिअर रोहितमुळे संपुष्टात आलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टेस्ट सीरिजला गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरुवात होत आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा (Rohit Sharma) देखील समावेश आहे. रोहित सध्या टी20 टीमचा कॅप्टन आहे. त्याचबरोबर त्यानं टेस्ट क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केलं आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहितनं शतक झळकावलं होतं. भारताच्या बाहेर रोहितनं टेस्ट क्रिकेटमध्ये झळकावलेलं हे पहिलंच शतक आहे. रोहितला टेस्टमध्येही ओपनिंगला पाठवण्याचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटचा निर्णय चांगलाच यशस्वी झाला असून त्याचे रिटर्नसही आता मिळत आहेत. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही रोहितकडून टीम इंडियाला अपेक्षा आहेत. रोहित शर्मा टेस्टमध्ये ओपनर म्हणून स्थिर झाल्यानं काही खेळाडूंचं करिअर धोक्यात आलं. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) मित्र असलेल्या मुरली विजयचं (Murali Vijay) आंतरराष्ट्रीय करिअर यामुळे संपुष्टात आलं. विराट आणि विजयनं टेस्ट क्रिकेटमध्ये एकत्र चांगली बॅटींग केली आहे. त्यामुळेच विजयला विराटचा टेस्ट क्रिकेटमधील चांगला मित्र समजलं जातं. विजयनं आजवर 61 टेस्टमध्ये 12 शतकांसह 3982 रन केले आहेत. विजय 2018 साली टीम इंडियासाठी शेवटची टेस्ट मॅच खेळला आहे. त्यानंतर त्याचा फॉर्म देखील चांगलाच घसरला आहे. त्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं आहे. टीम इंडियाच्या माजी कॅप्टननं लग्नानंतर 2 दिवसांनी बायकोला एकटं सोडलं, पत्नीनं शेअर केले Photos रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यास सुरूवात केली. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याला सर्वप्रथम ओपनिंग करण्याची संधी दिली. या संधीचं रोहितनं सोनं केलं. वन-डे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली नुकत्यात  झालेल्या टी20 सीरिजमध्ये भारतानं न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: