मुंबई, 25 जून: टीम इंडियाचे क्रिकेटपटू हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R.Ashwin) यांनी सान्वी या 3 वर्षांच्या चिमुरडीच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. सान्वी सध्या ‘स्पाइनल मस्क्यूलर एट्रोफी’ या गंभीर आजारानं ग्रस्त आहे. या आजारावरील उपचारासाठी तिला इंजेक्शनची गरज असून त्यासाठी 16 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हनुमा विहारीनं याबाबत ट्विट करत म्हंटलं आहे की, ‘हे एक किंवा दोन लोकांच्या मदतीनं करणं शक्य नाही. पण सान्वीला इंजेक्शन मिळावे यासाठी प्रत्येकानं पुढं येण्याची गरज आहे.’ अश्विननं विहारीचं या ट्विटला रिट्विट केलं आहे. त्याचबरोबर ‘चला प्रयत्न करुया आणि आपल्याला शक्य आहे तितकं योगदान करूया.’ असं आवाहन अश्विननं केलं आहे.
Let’s try and help, contribute whatever we can. 💔💔 https://t.co/cbWwa00HbZ
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) June 25, 2021
हनुमा विहारीनं हे आवाहन करताच सान्वीला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या आवाहनानंतर दोन तासांमध्येच 70 हजार रुपयांचा निधी गोळा झाला. भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं (Jwala Gutta) देखील एक आयुष्य वाचवण्यासाठी पुढे या असं आवाहन सर्वांना केलं आहे. WTC Final हरल्यानंतर टीम इंडियाचा Holiday सुरू, ‘या’ दोन स्पर्धा पाहण्याची तयारी काही महिन्यांपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी अयांश गुप्ता या लहान मुलाचा जीव वाचवला होता. अयांशवरील उपचारासाठी जोल्गेनस्मा या जगातील सर्वात महागड्या औषधाची गरज होती. या औषधासाठी मदत गोळा करण्यासाठी अयांशच्या आई वडिलांनी ‘AyaanshFightsSMA’ हे ट्विटर हँडल सुरू केले होते. त्या ट्विटर हँडलवर त्यांनी अयांशसाठी हे औषध मिळाल्याची माहिती दिली होती. त्यासाठी त्यांनी विराट आणि अनुष्काचे आभार मानले होते.