मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित शर्मानं कॅप्टन होताच दिली विराटबद्दल पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

रोहित शर्मानं कॅप्टन होताच दिली विराटबद्दल पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) बाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) बाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) बाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 डिसेंबर:  टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) बाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीचा बॅटर म्हणून असलेला दर्जा आणि त्याच्या नेतृत्त्व कौशल्याची टीमला गरज आहे, असे मत रोहितने व्यक्त केले आहे. कॅप्टनचे मैदानातील काम हे 20 टक्के असते आणि बाकी काम हे रणनीती तयार करण्याचे असते असे त्याने सांगितले. त्याचबरोबर आपले खेळाडू आयसीसी स्पर्धेच्या मोठ्या लढतीत निर्णायक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असावेत अशी प्रत्येक कॅप्टनची इच्छा असते, असे रोहित यावेळी म्हणाला.

'विराट कोहलीसारखा बॅटर नेहमीच आवश्यक आहे. टी20 आणि वनड-डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी जबरदस्त आहे. विराटने टीमला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. सर्व खेळाडू चांगलं खेळत आहेत, ही खबरदारी घेण्याचे काम कॅप्टनचे असते. त्याला योग्य समन्वय आणि रणनीती तयार करण्यावर भर द्यावा लागतो. कॅप्टनने आपल्या प्रदर्शनातूनच बोललं पाहिजे.

'माझे बहुतेक काम हे मैदानाच्या बाहेर असेल. खेळाडूंवर जबाबदारी सोपवणे आणि त्यांनी मैदानात ती पूर्ण करावी याची काळजी मला घ्यायची आहे. तुमच्याकडे मैदानात तीन तास असतात. त्यामध्ये तुम्ही फार काही करू शकत नाहीत. कारण, मैदानात 11 खेळाडू खेळत असतात. असंही रोहित यावेळी म्हणाला.

Ashes Series: इंग्लिश फॅननं ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला केलं मैदानात प्रपोज, पाहा VIDEO

'चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 साली झालेला वर्ल्ड कप आणि अगदी यंदाचा वर्ल्ड कप या तीन्ही स्पर्धेत आम्ही मॅचच्या पहिल्या टप्प्यात पराभूत झालो. या विषयाची मी खबरदारी घेणार आहे. आम्हाला अगदी खराब परिस्थितीचा सामना करण्यासाठी देखील सज्ज राहिले पाहिजे. 3 आऊट 10 या परिस्थितीमधूनही टीमला बाहेर पडता यायला हवे. 3 आऊट 10 असा स्कोअर असेल तर 180 किंवा 190 रन होणार नाहीत, असेही कुठेही लिहिलेलं नाही. टीमनं या पद्धतीनं तयारी करावी अशी माझी इच्छा आहे.' असे रोहितने एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

First published:

Tags: Cricket news, Icc, Rohit sharma, Virat kohli