मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /प्रशिक्षकाचं काम इतकंच नाही की...; पृथ्वी शॉसाठी गंभीरची बॅटिंग

प्रशिक्षकाचं काम इतकंच नाही की...; पृथ्वी शॉसाठी गंभीरची बॅटिंग

श्रीलंकेविरुद्ध मालिकेतून पृथ्वी शॉला वगळल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटूने त्याच्यासाठी राहुल द्रविड आणि निवड समितीला एक विनंती केलीय.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेतून पृथ्वी शॉला वगळल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटूने त्याच्यासाठी राहुल द्रविड आणि निवड समितीला एक विनंती केलीय.

श्रीलंकेविरुद्ध मालिकेतून पृथ्वी शॉला वगळल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटूने त्याच्यासाठी राहुल द्रविड आणि निवड समितीला एक विनंती केलीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 जानेवारी : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. यात अनेक युवा खेळाडूंची निवड झाली आहे. मात्र पुन्हा एकदा भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. मुंबईचा सलमावीर फलंदाज असलेल्या पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. 181.42 च्या स्ट्राइक रेटने 336 धावा केल्या. पृथ्वीने जुलै २०२१ नंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. त्याने 2018 मध्ये पदार्पण केल्यानंतर एकूण 18 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

पृथ्वी शॉ 2019 मध्ये डोपिंगमध्ये अडकला होता. यानंतर त्याच्यावर 8 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून त्याच्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. डोपिंग प्रकरण मागे टाकत पृथ्वी शॉने भारतीय संघात पुनरागमन केलं पण त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. आता पृथ्वी शॉसाठी भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने 'बॅटिंग' केलीय. निवड समिती आणि प्रशिक्षकांच्या स्टाफची जबाबदारी आहे की क्वालिटी प्लेयर पृथ्वी शॉची काळजी घ्यावी असं गंभीरला वाटतं.

हेही वाचा : पंतपासून सूर्यकुमारपर्यंत कोण ठरलं टॉप? BCCIने जारी केलं 2022चं रिपोर्ट कार्ड

गौतम गंभीरने म्हटलं की, प्रशिक्षक कशासाठी आहेत? निवड समिती कशासाठी आहे? ते फक्त थ्रो डाउन आणि त्यांना तयार करण्यासाठी नाही. शेवटी निवडकर्ता, प्रशिक्षक, व्यवस्थापनाने अशा खेळाडूंसाठी प्रयत्न आणि मदत करायला हवी. पृथ्वी शॉसारखा खेळाडू ज्याच्या प्रतिभेबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याला योग्य ट्रॅकवर आणायला हवं आणि हे मॅनेजमेंटचं काम आहे.

मला वाटतं की जर फिटनेस किंवा लाइफस्टाइलचा प्रश्न आहे तर कुणीतरी, मग राहुल द्रविड असेल किंवा निवडसमितीचे अध्यक्ष यांनी पृथ्वी शॉसोबत बोलायला हवं. जे लोक योग्य ट्रॅकवर असायला हवे त्यांनी ग्रुपसोबत असायला हवं. त्यांना योग्य पद्धतीने मॉनिटर करता येईल. कारण जेव्हा तुम्ही त्यांना वेगळं सोडता. ते कुठेही जाऊ शकतात असंही गंभीरने म्हटलं.

हेही वाचा :  ऋषभ पंत दारू पिऊन कार चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी दिली मोठी महिती

गंभीर म्हणाला की, पृथ्वी शॉने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची जशी होती आणि त्याच्याकडे जी प्रतिभा आहे ते पाहता त्याचं समर्थन करायला हवं. तो इथंपर्यंत कसा पोहोचला, त्यानं कोणत्या आव्हानांचा सामना केला. आता व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर अवलंबून आहे की त्याची काळजी घ्यावी आणि योग्य ट्रॅकवर आणायला मदत करावी.

First published:

Tags: Gautam gambhir, Prithvi Shaw