मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मोठी बातमी! भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल, रवी शास्त्री सोडणार टीम इंडियाची साथ

मोठी बातमी! भारतीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल, रवी शास्त्री सोडणार टीम इंडियाची साथ

टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरु झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.

टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरु झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.

टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरु झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पद सोडण्याचे संकेत दिले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 ऑगस्ट : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरु झाली आहे. युएईमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर. श्रीधर आणि बॅटींग कोच विक्रम राठोड भारतीय टीमपासून वेगळं होण्याची शक्यता आहे. शास्त्रीनं बीसीसीआयच्या काही सदस्यांना याबाबतची सूचना दिली आहे. त्याचबरोबर अन्य कोचिंग स्टाफची देखील आयपीएल टीमबरोबर चर्चा सुरू आहे.

'इंडियन एक्स्प्रेस' च्या रिपोर्टनुसार नवा कोचिंग स्टाफ असावा अशी बीसीसीआयची देखील इच्छा आहे. शास्त्री 2014 ते 2016 मधील टी20 वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचे संचालक होते. त्यानंतर अनिल कुंबळे एक वर्ष मुख्य प्रशिक्षक होते.  2017 साली कुंबळेला दूर करत पुन्हा एकदा रवी शास्त्रीची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

भारतीय बॉलर्सचा जगभर दबदबा वाढवण्यात भरत अरुण यांची भूमिका निर्णायक आहे. तर आर. श्रीधर यांनी भारतीय फिल्डर्सना अधिक चपळ बनवलं आहे. शास्त्रींच्या कारकिर्दीमध्ये टीम इंडियाचा 2019 मधील वन-डे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. त्यांच्या मार्गदर्नाखाली भारतीय टीमला एकाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. असं असलं तरी, शास्त्रींच्या कार्यकाळात टीम इंडियानं सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे. तसंच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

IND vs ENG: टीम इंडियाला धक्का, लॉर्डस टेस्टपूर्वी ‘या’ खेळाडूला दुखापत

द्रविड घेणार जागा?

टीम इंडियाचा स्तर उंचावण्यासाठी तसंच जागतिक पातळीवर टीमला अजिंक्य बनवण्यासाठी काही बदलांची गरज असल्याचं बीसीसीआयचं मत आहे. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यानंतर नियामानुसार बीसीसीआय नव्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवेल. राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होईल, असे संकेत बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

श्रीलंका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या राहुल द्रविडचा नॅशनल क्रिकेट अकादामी (NCA) संचालक पदाचा कालावधी समाप्त झाला आहे. बीसीसाआयनं या जागेसाठी नवे अर्ज मागवले आहेत. द्रविडची जुलै 2019 मध्ये संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानं यापूर्वी टीम इंडिया अंडर-19 आणि भारत ए टीमचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. टीम इंडियातील तरुण खेळाडूंना घडवण्यात द्रविडचे योगदान मोठे आहे. द्रविडनं एनसीए प्रमुख पदासाठी पुन्हा एकदा अर्ज केला नाही तर त्याची शास्त्रीच्या जागी नियुक्ती होईल, हे स्पष्ट आहे.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, Ravi shastri