लॉर्ड्स, 11 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट (India vs England 2nd Test) गुरुवारपासून लॉर्ड्सवर सुरु होणार आहे. ही टेस्ट जिंकून 5 टेस्टच्या सीरिजमध्ये आघाडी घेण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. पहिली टेस्ट पावसानं ड्रॉ झाल्यानं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात होणाऱ्या टेस्टला आता महत्त्व आलं आहे.
या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी झालाय. शार्दुलला स्नायूची दुखापत (hamstring injury) झाली आहे. आता त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय मेडिकल रिपोर्टनंतर घेतला जाणार आहे. शार्दुल ठाकूरला त्याच्या बॅटींगमधील कौशल्यामुळे नॉटिंघम टेस्टमध्ये संधी देण्यात आली होती. तो नॉटिंघममध्ये शून्यावर आऊट झाला असला तरी त्यानं 4 विकेट्स घेत उपयुक्त बॉलिंग केली होती. शार्दुलच्या जागी अनुभवी इशांत शर्माचा (Ishant Sharma) टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. भारतीय टीम या सीरिजमध्ये 4 फास्ट बॉलरसह खेळणार असल्याचं विराट कोहलीनं यापूर्वीच जाहीर केलंय.
कसं आहे लॉर्ड्सचं हवामान?
नॉटिंघम टेस्टमधील टीम इंडियाचा विजय पावसानं हिरावला. आता गुरुवारपासून सुरु होणाऱ्या टेस्टच्या कालावधीत लॉर्ड्सवरील हवामान कसे असेल याची फॅन्सना उत्सुकता आहे. Accuweather नुसार पहिल्या दिवशी तापमान 23 डिग्री सेल्सियस असेल, तसंच पावसाची शक्यता कमी आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 13 ऑगस्टलाही तापमान पहिल्या दिवासारखंच असेल, पण दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. ढग असले तरी पावसाची शक्यता कमी आहे.
IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरने सुरू केली 'धमाकेदार' तयारी!
14 ऑगस्ट म्हणजे मॅचच्या तिसऱ्या दिवशी थोडा जास्त उकाडा असेल, तर रविवारी 15 ऑगस्टला हवामान चांगला राहिल. 16 ऑगस्टलाही पावसाचा अंदाज नसल्याचं हवामान खात्यानं सांगतिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england