जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बापरे! विराटचा पगार किती आहे माहितेय का? पाकिस्तानच्या संपूर्ण टीमला पुरेल इतकी कमाई

बापरे! विराटचा पगार किती आहे माहितेय का? पाकिस्तानच्या संपूर्ण टीमला पुरेल इतकी कमाई

बापरे! विराटचा पगार किती आहे माहितेय का? पाकिस्तानच्या संपूर्ण टीमला पुरेल इतकी कमाई

विराटला कोहलीला (Virat Kohli) जाहिरातीमधून मिळणारा पैसा बाजूला ठेवला आणि बीसीसीआयकडून (BCCI) मिळणारा वार्षिक पगाराचा विचार केला तरी त्याचा पगार हा संपूर्ण पाकिस्तानच्या क्रिकेट टीमच्या (Pakistan Cricket Team) बरोबर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा रनमशिन म्हणून ओळखला जातो. रोज नवे रेकॉर्ड करणारा कोहली कमाईमध्येही अव्वल आहे. जगात सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये विराटचा समावेश होता. विराटला जाहिरातीमधून मिळणारा पैसा बाजूला ठेवला आणि बीसीसीआयकडून (BCCI) मिळणारा वार्षिक पगाराचा विचार केला तरी त्याचा पगार हा संपूर्ण पाकिस्तानच्या क्रिकेट टीमच्या (Pakistan Cricket Team) बरोबर आहे. बीसीसायनं भारतीय खेळाडूंसोबतचे वार्षिक करार गुरुवारी जाहीर केले. A प्लस या सर्वात अव्वल ग्रेडमध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या तिघांचा समावेश आहे. या खेळाडूंचा वार्षिक पगार 7 कोटी आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना पगार किती? पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांच्या खेळाडूंची 3 ग्रेडमध्ये विभागणी केली आहे. A ग्रेडमधील 3 खेळाडूंचा 11 लाख पाकिस्तानी रुपये ( जवळपास 5.20 लाख भारतीय रुपये) दर महिना दिले जातात. या ग्रेडमध्ये सध्या बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि अझहर अली यांची समावेश आहे. पाकिस्तानच्या B ग्रेडमधील खेळाडूंना 7.50 लाख पाकिस्तानी रुपये ( जवळपास 3.54 लाख भारतीय रुपये) तर C ग्रेडमधील लोकांना 5.50 लाख रुपये (जवळपास 2.60 लाख भारतीय रुपये) मिळतात. पाकिस्तानमधील A ग्रेडमध्ये 3, B ग्रेडमध्ये 9 तर C ग्रेडमध्ये 6 खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या पगाराचा भारतीय रुपयांमध्ये विचार केला तर पाकिस्तान टीमचा वार्षिक पगार हा एकट्या विराट कोहलीच्या पगारा इतका आहे. पाकिस्तान बोर्ड दरवर्षी खेळाडूंच्या फिसवर 7.4 कोटी रुपये खर्च करतं. VIDEO: टीम इंडियाच्या खेळाडूची इंग्लंडमध्ये झेप, जबरदस्त कॅच पाहून इंग्रजांना बसला धक्का भारतीय खेळाडूंचा पगार किती? बीसीसीआयनं गुरुवारी जाहीर केलेल्या करारानुसार A प्लस ग्रेडमधील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतील. A ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळणार आहे. ग्रेड B मधील खेळाडूंना 3 कोटी, तर C ग्रेडमधील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळतील. ग्रेड A प्लस:  विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह ग्रेड A:  आर. अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या ग्रेड B: वृद्धीमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि मयंक अग्रवाल ग्रेड C: कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात