जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 वर्ल्ड कप आयोजनासाठी शेजारी देश तयार, BCCI शी सुरू आहे चर्चा

T20 वर्ल्ड कप आयोजनासाठी शेजारी देश तयार, BCCI शी सुरू आहे चर्चा

T20 वर्ल्ड कप आयोजनासाठी शेजारी देश तयार, BCCI शी सुरू आहे चर्चा

यावर्षी होणारा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) भारताबाहेर करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी युएई, ओमान पाठोपाठ भारताच्या शेजारी देशानेही रस दाखवला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जून : या वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2021) स्पर्धेचे  बीसीसीआय (BCCI) यजमान आहे. या स्पर्धेचं आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. भारतामधील कोरोना व्हायरसच्या (coronavirus) परिस्थितीमुळे अन्य देशात ही स्पर्धा आयोजित करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्यासाठी यूएई (UAE) आणि ओमान (Oman) या देशांशी चर्चा सुरू आहे. त्यापाठोपाठ भारताच्या शेजारी देशानंही रस दाखवला आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेनं या वर्ल्ड कपच्या आयोजनाची तयारी दाखवली आहे. याबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बीसीसीआयशी चर्चा सुरू आहे. श्रीलंकेनं यापूर्वी आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने आयोजित करण्याचा प्रस्तावही बीसीसीआयसमोर ठेवला होता. श्रीलंकेचा प्रस्ताव का? आयसीसीच्या 1 जून रोजी झालेल्या बैठकीत बीसीसीआयला या स्पर्धेबाबत निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत सध्या यूएईशी चर्चा सुरु असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ANI ला दिली आहे. “युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या दरम्यान पिचची अवस्था तितकी चांगली नसेल. पिचच्या परिस्थितीचा विचार करुन श्रीलंका बोर्डशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र सध्या ही चर्चा प्राथमिक पातळीवर सुरू आहे,’’ असे या अधिकाऱ्याने सांगितले. “या वर्ल्ड कपचे आयोजन भारताबाहेर झाले तरी सर्व अधिकार हे बीसीसीआयकडेच असतील. यूएईमध्ये या स्पर्धेसाठी अबूधाबी, दुबई आणि शारजा ही  तीन ठिकाणं आहेत. तर श्रीलंकेत अनेक पर्याय आहेत,’’  असे या अधिकाऱ्याने सांगितले. खलिस्तानी दहशतवाद्यांना ‘शहीद’चा दर्जा देणाऱ्या हरभजन सिंगवर कारवाईची मागणी 15 जूनपर्यंत माहिती देणे बंधनकारक बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की आयसीसीला 15 जूनपर्यंत कर सवलतीची  खात्री देणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या विषयांवर चर्चा सुरू होईल. बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये 2016 सालापासून कराबाबत वाद सुरू आहे.  कर सवलत न मिळाल्यास आयसीसीला 900 कोटींचा फटका बसणार आहे. त्या परिस्थितीमध्ये आयसीसी बीसीसीआयला मिळणाऱ्या रकमेतून ही रक्कम  कमी करण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात