मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : वेळापत्रक जाहीर होताच बाबर आझमनं टीम इंडियाला डिवचलं!

T20 World Cup : वेळापत्रक जाहीर होताच बाबर आझमनं टीम इंडियाला डिवचलं!

टी 20 वर्ल्ड कपमध्ये  भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांचा महामुकाबला 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या महामुकाबल्याची तारीख जाहीर होतीच पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 18 ऑगस्ट : टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) स्पर्धेचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. आयसीसीनं या स्पर्धेचं वेळापत्रक आता जाहीर केलंय. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही टीमचा एका ग्रुपमध्ये समावेश आहे. टी20 वर्ल्ड कपमधील हा महामुकाबला 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या महामुकाबल्याची तारीख जाहीर होतीच पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने टीम इंडियाला इशारा दिला आहे. बाबर आझमनं आयसीसीच्या वेबसाईटशी बोलताना सांगितले की, ' पाकिस्तानसाठी ही टी20 स्पर्धा एका घरगुती स्पर्धेसारखी आहे. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही यूएईमध्ये क्रिकेट खेळत होता. आम्ही या काळात फक्त चांगला खेळ केला नाही तर टॉप टीमचा पराभव करत रँकिंगमध्ये टॉपवर पोहचलो. आमचे सर्व खेळाडू सध्या उत्साहित आहेत. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये आमचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची आम्हाला संधी आहे.' टी 20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानची टीम न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. याबाबत बाबर म्हणाला की, 'न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेचा आम्हाला उपयोग होणार आहे. आम्ही या मालिकेत आमच्या टीममधील कमतरता दूर करणार आहोत. त्याचबरोबर जास्तीत जास्त मॅच जिंकत वर्ल्ड कपपूर्वी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.' टी 20 वर्ल्ड कपचा हा सातवा प्रकार आहे. पाकिस्ताननं यापूर्वी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर, 2 दिग्गजांचा समावेश नाही टी-20 वर्ल्डकपसाठी ग्रुप कसे असणार याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. पहिल्या राउंडमध्ये 8 टीम्स सुपर 12 मध्ये जागा बनवण्यासाठी खेळतील. ग्रुप-एमध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमान या टीम आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकी सर्वोच्च दोन-दोन टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय होतील. सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. याआधी 17 ऑक्टोबरपासून पहिल्या राउंडचे सामने खेळले जातील. सुपर 12 च्या ग्रुप 1 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिय, साउथ आफ्रिकेसह पहिल्या राउंडच्या ग्रुप ए मधील विजेता संघ आणि ग्रुप बीचा रनर अप संघ असेल. तर ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसह पहिल्या राउंडमधील ग्रुप बीचा विजेता संघ आणि ग्रुप ए ची रनर अप टीम असेल. दुबई,अबूधाबी, शारजाह आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हा वर्ल्ड कप होणार आहे.
First published:

Tags: Babar azam, Cricket news

पुढील बातम्या