दुबई, 20 मे: कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करावी लागली. त्यापाठोपाठ आणखी एक स्पर्धा भारताच्या बाहेर होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणारा टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) युएईमध्ये होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षीची आयपीएल स्पर्धा (IPL 2020) देखील युएईमध्ये झाली होती. आयसीसीच्या (ICC) एक जून रोजी होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) देखील वेगवेगळ्या राज्य संघटनांशी या विषयावर चर्चा करणार आहे. मागच्या महिन्यात बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत टी20 वर्ल्ड कपसाठी मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगलुरु, धर्मशाला आणि लखनौ या शहरांची नावे निश्चित झाली होती.
बीसीसीआयची 29 मे रोजी विशेष बैठक होणार आहे. आयसीसीच्या 1 जून रोजी होणाऱ्या बैठकीच्या पूर्वी ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये टी20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत बीसीसीआयची भूमिका स्पष्ट होणार आहे. यापूर्वी अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतामध्ये टी 20 वर्ल्ड कप आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार होता. मात्र, आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं बीसीसीआयची यजमानपदाची दावेदारी कमकुवत झाली आहे.
उर्वरित आयपीएल भारतामध्ये नाही
आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन भारतात होणार नाही, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने 29 सामन्यांनंतर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पुढचे 31 सामने झाले नाहीत, तर बोर्डाचं जवळपास 2500 कोटी रुपयांचं नुकसान होईल.
टीम इंडियाचं गुलाबी स्वप्न होणार पूर्ण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडणार इतिहास
'खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन होणं त्रासदायक ठरत आहे. आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे सांगणं अवघड आहे, पण इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि युएई स्पर्धेचं आयोजन करण्याच्या रेसमध्ये आहेत.' असं गांगुलीने स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.