मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: ... तर हार्दिक पांड्याचा टीम इंडियाला मोठा फायदा होईल, कपिल देवनं सांगितलं कारण

T20 World Cup: ... तर हार्दिक पांड्याचा टीम इंडियाला मोठा फायदा होईल, कपिल देवनं सांगितलं कारण

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारताच्या प्रवासाची सुरूवात 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 20 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारताच्या प्रवासाची सुरूवात 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. वर्ल्ड कपची चांगली सुरूवात करण्यासाठी भारतीय टीमला पाकिस्तान विरुद्धची पहिली मॅच जिंकणे आवश्यक आहे. या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करणार का? हा एक मोठा प्रश्न भारतीय फॅन्सना आहे.

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन आणि महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी हार्दिक पांड्याच्या बॉलिंगबात मत व्यक्त केलं आहे.'हार्दिकनं किमान 2 ओव्हर बॉलिंग केली तरी विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला मोठा फायदा होईल,' असं मत कपिलनं 'स्पोर्ट्सकीडा' शी  बोलताना व्यक्त केलं आहे.

कपिल यावेळी म्हणाला की, 'एका ऑल राऊंडरमुळे टीममध्ये नेहमी फरक पडतो. हार्दिक पांड्यानं बॉलिंग केली तर विराट कोहलीला आणखी एक पर्याय मिळेल. अर्थात टीम इंडियाकडं त्याची कमतरता पूर्ण करणारे खेळाडू आहेत, ' याकडंही कपिलनं लक्ष वेधलं.

हार्दिक पांड्यानं नुकत्याच यूएईमध्ये संपलेल्या आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये बॉलिंग केली नव्हती. तसंच त्यानं बॅटींगमध्येही कमाल केली नाही. तरीही तो एक बॅटर म्हणून टीममध्ये खेळण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या खराब फिटनेसमुळे टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. डावखुरा स्पिनर अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. शार्दुलनं या आयपीएलमध्ये चांगली बॉलिंग करत 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलपूर्वी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात शार्दुलनं बॅटींगनंही सर्वांना प्रभावित केलं होतं.

T20 World Cup: धोनी ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर काय बदललं? राहुलनं दिलं उत्तर

हार्दिकचा रेकॉर्ड जबरदस्त

हार्दिक पांड्याचा हा दुसरा टी20 वर्ल्ड कप आहे. यापूर्वी 2016 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिकनं बांगलादेश विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये अचूक बॉलिंग करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. त्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 5 विकेट्स घेतल्या होत्या. हार्दिकनं त्याच्या आजवरच्या टी20 कारकिर्दीमध्ये 170 मॅचमध्ये 8 अर्धशतकाच्या जोरावर 2700 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 142 इतका आहे. त्याचबरोबर त्यानं 110 विकेट्सही घेतल्या आहेत.

First published:

Tags: Hardik pandya, T20 world cup