Home /News /sport /

T20 World Cup : मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाला मिळाली नवी जबाबदारी, 'या' टीमला करणार वर्ल्ड कपमध्ये मार्गदर्शन

T20 World Cup : मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाला मिळाली नवी जबाबदारी, 'या' टीमला करणार वर्ल्ड कपमध्ये मार्गदर्शन

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) आयपीएलमधील यशस्वी कामगिरीत त्यांचा हेड कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardena) याचा मोठा वाटा आहे. त्याला आता नवी जबाबदारी मिळाली आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) आयपीएलमधील यशस्वी कामगिरीत त्यांचा हेड कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardena) याचा मोठा वाटा आहे. मुंबईसह जगभरातील टी20 लीगमध्ये खेळणाऱ्या वेगवेगळ्या टीमचा जयवर्धने कोच असून त्या लीगमध्येही त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. त्याच्या या रेकॉर्डमुळे रवी शास्त्रींच्या उत्तराधिकारीपदासाठी त्याचं नाव चर्चेत आहे. जयवर्धनेनं पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडिया नाही तर अन्य एका टीमची जबाबदारी स्विकारली आहे. युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या राष्ट्रीय टीमचा सल्लागार म्हणून जयवर्धनेचे नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा देखील सध्या यूएईमध्येच सुरू आहे. त्यानंतर 16 ते 23 ऑक्टोबर या काळात तो श्रीलंका टीमचा सल्लागार म्हणून काम करेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा सल्लागार म्हणूनही त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी जयवर्धनेचा कार्यकाळ पाच महिने असेल. हार्दिक पंड्या कुठे झाला गायब? Mumbai Indians च्या बॉलिंग कोचने दिलं उत्तर आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर जयवर्धने श्रीलंकेच्या राष्ट्रीय टीमसोबत काम करण्यास सुरूवात करेल. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डि सिल्वा यांनी यावेळी सांगितले की, 'आम्ही महेलाचं नव्या भूमिकेत स्वागत करतो. श्रीलंकेची मुख्य टीम आणि U19 टीमसोबतच्या त्याच्या उपस्थितीचा खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे. क्रिकेटच्या ज्ञानाचा त्याच्याकडं खजिना आहे. त्यानं खेळाडू, कॅप्टन तसंच कोच म्हणून आजवर मोठं यश मिळवलं आहे.' T20 वर्ल्ड कपची BCCI ला काळजी, IPL टीम्सना पत्र लिहून केली 'हे' आवाहन श्रीलंकेचा महान बॅट्समन अशी जयवर्धनेची ओळख आहे. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 11, 814 तर वन-डे क्रिकेटमध्ये 12, 650 रन केले आहेत. त्याचबरोबर 38 टेस्ट, 129 वन-डे आणि 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्यानं श्रीलंकेची कॅप्टनसी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जयवर्धनेनं भारत, बांगलादेश आणि इंग्लंडच्या टी20 लीगमधील टीमचा हेड कोच म्हणून काम केले आहे. तसंच काही काळ इंग्लंडच्या राष्ट्रीय टीमसोबतही  तो होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai Indians, T20 world cup

    पुढील बातम्या