मुंबई, 10 नोव्हेंबर: विराट कोहलीनं (Virat Kohli) T20 इंटरनॅशनल टीमची कॅप्टनसी सोडली आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) विराटची जागा घेतली आहे. 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी20 सीरिजमध्ये भारतीय टीम रोहितच्या कॅप्टनसीमध्ये मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयनं या टीमची घोषणा केली असून विराटला विश्रांती देण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या घोषणेनंतर विराट कोहलीनं एक ट्विट करत रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि अन्य सहयोगी स्टाफाचे आभार मानले आहेत. 'एका टीमच्या अद्भूत प्रवासासाठी तसंच चांगल्या आठवणीसाठी तुमच्या सर्वांचे आभार. तुम्ही जबरदस्त योगदान दिलं. भारतीय क्रिकेट हे कधीही विसरणार नाही. आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' असं ट्विट विराटनं केलं आहे.
T20 वर्ल्ड कपमधील भारताचे आव्हान संपुष्टात येताच टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री आणि अन्य सहयोगी स्टाफचा कार्यकाळ संपला आहे. आपण पुन्हा कोच होणार नसल्याचं शास्त्रींनी यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यांच्या जागी माजी कॅप्टन राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविड न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजपासून टीम इंडियाची जबाबदारी सांभाळणार आहे.
Thank you for all the memories and the amazing journey we've had as a team with you all. Your contribution has been immense and will always be remembered in Indian cricket history. Wish you the best moving forward in life. Until next time ⭐ pic.twitter.com/42hx4Q7cfq
— Virat Kohli (@imVkohli) November 10, 2021
न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये असलेले विराट कोहली, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, राहुल चहर आणि शार्दूल ठाकूर हे न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज खेळणार नाहीत. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल या नव्या चेहऱ्यांना टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
IPL गाजवणाऱ्या 3 खेळाडूंना टीम इंडियात पहिल्यांदाच संधी, न्यूझीलंडची घेणार परीक्षा
भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर.अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ravi shashtri, T20 world cup, Virat kohli