मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम इंडियाचे 3 खेळाडू ठरले विराटसाठी व्हिलन, शेवटच्या स्पर्धेतही नामुश्की

T20 World Cup: टीम इंडियाचे 3 खेळाडू ठरले विराटसाठी व्हिलन, शेवटच्या स्पर्धेतही नामुश्की

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी भारतीय क्रिकेट टीम यंदा सेमी फायनलमध्येही प्रवेश करू शकली नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जाणारी भारतीय क्रिकेट टीम यंदा सेमी फायनलमध्येही प्रवेश करू शकली नाही. 2012 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये टीमवर ही नामुश्की ओढावली आहे. कॅप्टन विराट कोहलीसाठी ही कामगिरी अधिकच निराशाजनक आहे. कारण, विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची ही शेवटची टी20 स्पर्धा होती. या स्पर्धेनंतर टी20 प्रकारातील कॅप्टनसी सोडणार असल्याचं विराटनं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

विराट कोहलीटचं स्वप्न भंग होण्यासाठी टीम इंडियाची पहिल्या दोन मॅचमधील खराब कामगिरी निर्णायक ठरली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला पराभूत करत टीम इंडियानं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण ते पुरेसं ठरलं नाही. भारतीय क्रिकेट टीममधील 3 खेळाडूंची कामगिरी या पराभवाचं कारण ठरली आहे.

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या हाफमध्ये बॉलिंग केली नव्हती.

त्याचा फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी ढासळल्या होत्या. त्यामुळे त्याच्या टीममधील निवडीवर प्रश्न उपस्थित झाले होते. हार्दिकनं पाकिस्तान विरुद्ध बॉलिंग केली नाही. तसंच बॅटींग करताना त्यांचा खांदा दुखावला होता. तरीही हार्दिक या स्पर्धेतील सर्व मॅचमध्ये खेळला. हार्दिककडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्यानं बॅटींग आणि बॉलिंगमध्ये निराशा केली.

भुवनेश्वर कुमार

टी20 वर्ल्ड कपमध्ये अनुभवी बॉलर भुवनेश्वर कुमारही (Bhuvneshwar Kumar) फेल गेला. दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर भुवनेश्वरचा फॉर्म खालावला आहे. आयपीएलमध्ये तो फारसा यशस्वी ठरला नव्हता. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं खराब बॉलिंग केली. त्याची बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी चांगलीच धुलाई केली. भुवनेश्वरनं तीन ओव्हरमध्ये 25 रन दिले. त्यानंतर भुवनेश्वरला पुढील मॅचमधून वगळण्यात आले.

विल्यमसननं विराटला दिली आयुष्यभराची जखम, सलग तिसऱ्यांदा मोडलं स्वप्न

वरुण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्तीचा (Varun Chakravarthy) आयपीएलमधील दरारा टी20 वर्ल्ड कपमध्ये दिसलाच नाही. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या अनुभवी स्पिनर्सच्या जागी वरुणचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पण निवड समितीचा हा विश्वास त्याला सार्थ ठरवता आला नाही. वरुणला पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही. वरुणचं अपयश टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं महत्त्वाचं कारण ठरलं.

First published:

Tags: T20 world cup, Team india, Virat kohli