जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: 'काही जणांना आता छान झोप लागेल', विराटनं कॅप्टनसी सोडताच डिविलियर्सचं वक्तव्य VIDEO

IPL 2021: 'काही जणांना आता छान झोप लागेल', विराटनं कॅप्टनसी सोडताच डिविलियर्सचं वक्तव्य VIDEO

IPL 2021: 'काही जणांना आता छान झोप लागेल', विराटनं कॅप्टनसी सोडताच डिविलियर्सचं वक्तव्य VIDEO

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) यांच्यात मंगळवारी झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीचा (Virat Kohli) आरसीबी कॅप्टन म्हणून प्रवास संपला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 ऑक्टोबर: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) यांच्यात मंगळवारी झालेली मॅच अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे गाजली. या मॅचमधील अंपायर वीरेंद्र शर्मा (Virender Sharma) यांच्यासाठी तो दिवस खराब होता. त्यांचे तीन निर्णय बदलण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी आरसीबीच्या (RCB) बाबतीमध्येच हा प्रकार घडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) केकेआरच्या इनिंगमधील  7 व्या ओव्हरमध्ये अंपायर वीरेंद्र शर्मा (Virender Sharma) सोबत चांगलाच वाद झाला. यावेळी युजवेंद्र चहलच्या बॉलिंगवर राहुल त्रिपाठी आऊट असल्याचं अंपायर शर्मा यांनी नकारालं होतं. त्यावर आरसीबीनं DRS च्या माध्यमातून थर्ड अंपायरकडं दाद मागितली. बॉल ट्रॅकरच्या माध्यमातून तो बॉल राहुलच्या पॅडला लागून मिडल स्टंपला लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे थर्ड अंपायरनं शर्मा यांचा निर्णय रद्द करत राहुल त्रिपाठीला आऊट घोषित केलं. या सर्व प्रकारानंतर विराट कोहली आणि शर्मा यांच्यात मोठी चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी विराट नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. मॅचनंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये हाच मुद्दा पकडत टीमचा प्रमुख खेळाडू एबी डिविलियर्स (AB de Villiers) यानं विराट कोहलची थट्टा केली आहे. यावेळी बोलताना डिविलियर्सनं प्रथम विराटचे त्यानं आरसीबीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. ‘सध्या एकच शब्द डोक्यात येतोय तो म्हणजे आभार. तू आमचं नेतृत्त्व केलंस म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. तू ज्या पद्धतीनं टीमची कॅप्टनसी केलीस, आम्हाला प्रेरणा दिलीस याचा तू विचार केला आहेत त्यापेक्षा देखील जास्त प्रभाव पडला आहे. तू फक्त क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर बाहेरही आम्हाला प्रेरणा दिली आहेस. Video: RCB संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये विराटला निराश पाहून चाहत्यांचंही तुटलं काळीज हे सर्व एका ट्रॉफीपेक्षा जास्त मोलाचे आहे. याचा तुला भविष्यात उपयोग होईल, असा मला विश्वास आहे. तू खूप चांगलं काम केलं आहेस. तू आमच्यासाठी जे काही केलंस त्याबद्दल आभार. आणि मला असं वाटतंय की, काही अंपायर्स आता सुखानं झोपू शकतील. मला त्यांच्यासाठी आनंद होत आहे,’ असं डिविलियर्स शेवटी हसत म्हणाला.

विराट कोहलीनं 2013 पासून आरसीबीची कॅप्टनसी केली. यामध्ये चार वेळा आरसीबीनं ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला. कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आरसीबनं 140 मॅच खेळल्या. यापैकी 66 जिंकल्या तर 70 मॅचमध्ये टीमचा पराभव झाला. चार मॅचचा कोणताही निकाल लागला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात