Home /News /sport /

T20 World Cup ची टीम नक्की कोणी निवडली? Virat Kohli ला पाच धक्के!

T20 World Cup ची टीम नक्की कोणी निवडली? Virat Kohli ला पाच धक्के!

टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. 15 जणांची ही टीम निवडताना काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे ही टीम नक्की कोणी निवडली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    मुंबई, 8 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. 15 जणांची ही टीम निवडताना काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे ही टीम नक्की कोणी निवडली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही टीम निवडताना विराटला तब्बल पाच धक्के देण्यात आले आहेत. अश्विनचं कमबॅक 2017 नंतर पहिल्यांदाच मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये अश्विनची (R Ashwin) निवड करण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यातल्या पहिल्या चार टेस्टमध्येही विराटने अश्विनला संधी दिलेली नाही, यावरूनही त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. मागची चार वर्ष भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममधून बाहेर असलेल्या अश्विनचं थेट वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) दुखापतीमुळेही अश्विनचा टीममध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातंय. युझवेंद्र चहल युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हा टीम इंडियाचा टी-20 मधला सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे, पण त्यालाही टीमबाहेर करण्यात आलं आहे. युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबीकडून (RCB) खेळतो. तसंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टी-20 सीरिजमध्ये आणि श्रीलंका दौऱ्यातही चहल खेळला होता. पण वर्ल्ड कपसाठी राहुल चहरच्या स्पर्धेत युझवेंद्र चहल मागे पडला. मोहम्मद सिराजही आऊट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली टेस्ट सीरिज गाजवणाऱ्या फास्ट बॉलर मोहम्मद सिराजलाही (Mohammad Siraj) वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये संधी मिळालेली नाही. आयपीएलमध्ये सिराजही चहलप्रमाणेच विराटच्या आरसीबीकडून खेळतो. आयपीएलच्या मागच्या आणि या मोसमात सिराजने चांगली बॉलिंग केली होती, पण तरीही त्याची वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाली नाही. शिखर धवनला धक्का श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) यालाही वर्ल्ड कपसाठीच्या टीममधून वगळण्यात आलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्लीकडून विराटसोबत खेळलेल्या धवनला बाहेर करण्यात आल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एमएस धोनीचं पुनरागमन एमएस धोनी (MS Dhoni) याचं भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनी टीमचा मेंटर म्हणून काम करेल. विराट आणि शास्त्री यांचे संबंध चांगले असतानाही एमएस धोनीला अचानक टीममध्ये मेंटर म्हणून आणण्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: MS Dhoni, T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या