मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचं नाव, Video Viral होताच आली जाग

T20 World Cup: पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचं नाव, Video Viral होताच आली जाग

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमची जर्सी (Pakistan Cricket Team Jersey) व्हायरल झाली होती. यामध्ये यजमान म्हणून भारताच्या जागी यूएईचं नाव लिहिण्यात आलं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या 'ना पाक' कृतीवर जोरदार टीका झाली.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 17 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2021) सुरुवात 17 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून होत आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमान या दोन देशांमध्ये होत असली तरी यजमानपद भारतीय क्रिकेट बोर्डाकडंच (BCCI) आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा भारतामध्ये होणार होती. पण, कोरोनाच्या धोक्यामुळे या स्पर्धेचं ठिकाण हलवण्यात आलं.  पाकिस्तान क्रिकेट टीमच्या नवीन जर्सीचा व्हिडीओ (Pakistan Cricket Team New Jersey) पीसीबीनं ट्विट केला आहे. या जर्सीवर इंडियाचा उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान टीमची जर्सी व्हायरल झाली होती. यामध्ये यजमान म्हणून भारताच्या जागी यूएईचं नाव लिहिण्यात आलं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या 'ना पाक' कृतीवर जोरदार टीका झाली. या टिकेनंतर पीसीबीला जाग आली असून त्यांनी चूक सुधारली आहे. नियम काय सांगतो? आयसीसीच्या नियमांप्रमाणे विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांना जर्सीच्या उजव्या बाजूला स्पर्धेचे नाव आणि आयोजकांचे नाव त्यांच्या जर्सीवर लिहावे लागते.  भारत या टी 20 वर्ल्ड कपचा यजमान आहे. त्यामुळे सर्व देशांना जर्सीवर भारताचे नाव लिहिणे बंधनकारक आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  या फोटोत बाबरने पाकिस्तान संघाची जर्सी घातलेली आहे आणि जर्सीवर विश्वचषक आयोजक भारत लिहिण्याऐवजी यूएई लिहिले होते. पाकिस्तानने त्यांच्या जर्सीवर ‘आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक भारत’ असे लिहिणे अपेक्षित होते. आता नव्या जर्सीमध्ये ती चूक सुधारण्यात आली आहे. भारत- पाकिस्तान लढत 24 ऑक्टोबरला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मॅचपासूनच दोन्ही टीम वर्ल्ड कपच्या अभियानाला सुरूवात करतील. या स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व 5 मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला होता. T20 World Cup: पाकिस्तानपूर्वी 'या' दोन देशांशी होणार टीम इंडियाची लढत, पाहा संपूर्ण वेळापत्रक त्याचबरोबर 2012. 2014 आणि 2016 मध्येही टीम इंडियामं विजय मिळवला आहे. दोन्ही देशांच्या टीम 2 वर्षांनी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांची लढत झाली होती. त्यावेळी टीम इंडियानं पाकिस्तानवर 89 रननं दणदणीत विजय मिळवला होता.
First published:

Tags: Cricket news, Pakistan Cricket Board, T20 world cup

पुढील बातम्या