मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: पाकिस्तानपूर्वी 'या' दोन देशांशी होणार टीम इंडियाची लढत, पाहा संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup: पाकिस्तानपूर्वी 'या' दोन देशांशी होणार टीम इंडियाची लढत, पाहा संपूर्ण वेळापत्रक

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) यांच्यासोबत होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या या मॅचपूर्वी भारतीय टीम दोनदा मैदानात उतरणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धा (IPL 2021) समाप्त होताच क्रिकेट फॅन्सचं लक्ष आता टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup 2021) लागलं आहे. या स्पर्धेची सुरूवात आजपासून (17 ऑक्टोबर) होणार आहे. टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) यांच्यासोबत होणार आहे. या लढतीकडं संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या या मॅचपूर्वी भारतीय टीम दोनदा मैदानात उतरणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन विजेतेपदाच्या दावेदारांशी भारतीय टीम पाकिस्तानपूर्वी भिडणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी होणाऱ्या वॉर्मअप मॅचमध्ये टीम इंडियाचा या दोन देशांशी सामना होईल. या मॅचपासूनच भारतीय क्रिकेट टीमची वर्ल्ड कपची तयारी सुरू होईल.

आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचे खेळाडू सध्या सक्तीचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. काही दिवसांपर्यंत एकमेकांच्या विरुद्ध खेळणारे हे स्टार्स आता एकाच टीममध्ये खेळतील. भारतीय टीमला 2007 नंतर टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. तसंच 2013 नंतर टीम इंडियानं एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे हा वर्ल्ड कप विराट कोहलीच्या टीमसाठी खूप महत्त्वाचा असेल. या वर्ल्ड कपपूर्वी होणाऱ्या वॉर्म अप मॅचमधून विराटला अंतिम प्लेईंग 11 ठरवणे सोपे जाईल.

विराट कोहलीला त्याच्या मित्रांनी मागितली भारत-पाकिस्तान मॅचचं तिकीटं, वाचा काय दिलं कॅप्टननं उत्तर

टीम इंडियाची पहिली वॉर्म अप मॅच इंग्लंड विरुद्ध (India vs England) 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणारी ही मॅच डे-नाईट असून भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 7.30 वाजता सुरू होईल. तर दुसरी मॅच 20 ऑक्टोबर रोजी अबूधाबीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) होईल. ही मॅच दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर

T20 World Cup: BCCI नं तयार केले 7 दुश्मन! धोनीवर टीम इंडियाला वाचवण्याची जबाबदारी

टीम इंडियाचं वेळापत्रक

24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान

31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड

3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान

5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-बी क्वालिफायर टॉप टीम

8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-ए क्वालिफायर दुसरी टीम

10 नोव्हेंबर- पहिली सेमी फायनल

11 नोव्हेंबर- दुसरी सेमी फायनल

14 नोव्हेंबर- फायनल

First published:

Tags: Cricket news, India vs Australia, India vs england, T20 world cup