• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: KKR चं नुकसान केल्यानंतर मॉर्गनची दुटप्पी भूमिका, इंग्लंडला लावणार वेगळा न्याय

T20 World Cup: KKR चं नुकसान केल्यानंतर मॉर्गनची दुटप्पी भूमिका, इंग्लंडला लावणार वेगळा न्याय

नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) केकेआरकडून सर्वात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या इयन मॉर्गनचा (Eoin Morgan) दुटप्पीपणा उघड झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 ऑक्टोबर:  नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) केकेआरकडून सर्वात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या इयन मॉर्गनचा (Eoin Morgan) दुटप्पीपणा उघड झाला आहे. आयपीएलमध्ये मॉर्गन केकेआरचा कॅप्टन होता. त्यानं संपूर्ण स्पर्धेत 11 च्या सरासरीनं फक्त 133 रन काढले. सतत अपयशी ठरणाऱ्या मॉर्गननं स्वत:ला टीममधून ड्रॉप करावं अशी मागणी अनेक क्रिकेटपटूंनी केली होती. मॉर्गन त्याकडं दुर्लक्ष करत संपूर्ण आयपीएल खेळला. आता टी20 वर्ल्ड कपपूर्वी मात्र त्यानं या भूमिकेत बदल केला आहे. भारताविरुद्ध सोमवारी झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये मॉर्गन मैदानात उतरला नव्हता. आता त्यानं गरज पडली तर स्वत:ला वगळणार असल्याचं जाहीर केलं आहे. 'बीबीसी'शी बोलताना मॉर्गन म्हणाला की, 'मी वर्ल्ड कप टीमच्या मार्गातील अडथळा बनणार नाही. मी रन कमी काढले आहेत, पण माझं प्रदर्शन चांगलं आहे. टीमधील दुसऱ्या बॅटर्सनी चांगला खेळ केला तर मी स्वत:ला वर्ल्ड कपमध्ये विश्रांती देऊ शकतो. ' मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालीच 2019 साली इंग्लंडनं वन-डे वर्ल्ड कप जिंकला होता. यंदा बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्येही इंग्लंडला वर्ल्ड कप विजेतेपदाचा दावेदार मानलं जातंय. पण, मॉर्गनचा खराब फॉर्म टीमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यानं यावर्षी 7 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 12 च्या सरासरीनं फक्त 82 रन काढले आहेत. इंग्लंडची दुसरी वॉर्म अप मॅच न्यूझीलंड विरुद्ध आहे. त्यापूर्वी बोलताना मॉर्गन म्हणाला की, 'हा एक पर्याय आहे. चांगलं खेळत नसल्यानं हा प्रश्न विचारला जातोय. टी20 क्रिकेटमध्ये धोका पत्कारावा लागतो. मी त्यासाठी तयार आहे.' इंग्लंडची टी20 वर्ल्ड कपमधील पहिली मॅच शनिवारी वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या 9 इनिंगमध्ये मॉर्गननं फक्त एकदा दोन अंकी रन केले आहेत. या खराब फॉर्मनंतरही मॉर्गन आयपीएल फायनल खेळला आणि त्यानं फक्त 4 रन काढले. T20 World Cup मध्ये हिट होतेय 12 वर्षांची ही मुलगी, कर्तबगारी पाहून तुम्हालाही बसेल धक्का! इंग्लंडचा सर्वात यशस्वी बॅटर इयन मॉर्गन आंतरराष्ट्रीय  टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक रन करणारा बॅटर आहे. त्यानं 107 मॅचमध्ये 29 च्या सरासरीनं 2360 रन काढले आहेत. यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट 138 आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला 2 हजार रनचा टप्पा ओलांडता आलेला नाही. जोस बटलर 1781 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: