मुंबई, 1 सप्टेंबर : यूएई आणि ओमानमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2021) पडघम वाजू लागले आहेत. 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी टीमची निवड होण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय क्रिकेट टीमची निवड कधी होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टीम या विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याची संधी या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला आहे.
याबाबत प्रसिद्ध झालेल्य मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाची निवड भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील ओव्हल टेस्टनंतर होणार आहे. गुरुवारपासून ही टेस्ट सुरू होणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी भारतीय टीमची निवड होणार आहे. याचा अर्थ 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमधील प्रदर्शनाचा या निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
या वर्ल्ड कपसाठी 15 जणांची टीम जाहीर केली जाईल. तर 3 जण स्टँडबाय असतीस अशी माहिती आहे. मुंबईकर ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) विकेट किपर- बॅट्समन इशान किशन (Ishan Kishan) आणि एका स्पिनरची रिझर्व्ह खेळाडू म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे.
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर न गेलेल्या राखीव टीमनं श्रीलंका दौऱ्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे अंतिम 15 जणांची निवड करण्यासाठी निवड समितीला मोठी कसरत करावी लागेल. भारतीय टीमची पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
मोठी बातमी : हिटमॅन रोहित शर्माची झेप, पहिल्यांदाच टाकलं विराटला मागं!
त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध, 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध आणि 5 नोव्हेंबर रोजी सुपर 12 मध्ये स्पर्धेसाठी पात्र झालेल्या टीमशी (B1) भारतीय टीमचा सामना होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.