मुंबई, 15 ऑक्टोबर: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या मॅचला (T20 World Cup IND vs PAK Match) आता 9 दिवस उरले आहेत. वन-डे आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये आजवर एकदाही पाकिस्तानला टीम इंडियाला पराभूत करता आलेले नाही. यंदा देखील दोन्ही टीममध्ये भारतीय क्रिकेट टीमचं पारडं जड आहे. मात्र पाकिस्तानी खेळाडूंच्या भारताला पराभूत करण्याचे दावे सातत्यानं सुरू आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानला धक्का बसला आहे.
पाकिस्तानचे हाय परफॉर्मंन्स कोच ग्रँट ब्रॅडबर्न (Grant Bradburn) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू असलेले ब्रॅडबर्न गेल्या 3 वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेटशी जोडलेले होते. ते 2018 ते 2020 या काळात फिल्डिंग कोच होते. त्यानंतर त्यांच्याकडं कोचिंग विकासची जबाबदारी होती. ़
पीसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करणे ही अभिमानास्पद बाब होती, मी अनेक चांगल्या आठवणींसह निरोप घेत आहे. पीसीबीनं मला चांगल्या गोष्टी शिकण्याची आणि शिकवण्याची संधी दिली त्याबाबत आभार' असं ब्रॅडबर्न यांनी पद सोडताना सांगितलं आहे. रमिझ रझा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर पद सोडणारे ब्रॅडबर्म हे पाचवे अधिकारी आहेत. यापूर्वी हेड कोच मिसबाह उल हक, बॉलिंग कोच वकार युनूस, सीईओ वासिम खान आणि मार्केटींग हेड बाबर हमीद यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
T20 वर्ल्डकपवरुन भज्जीने उडवली शोएब अख्तरची खिल्ली, म्हणाला...
55 वर्षांच्या ब्रॅडमन यांना कोरोना प्रोटोकॉलमुळे कुटुंबासोबत जास्त वेळ देता येत नव्हता. 'माझी पत्नी मारी आणि तीन मुलांनी पाकिस्तान क्रिकेटसोबत काम करण्याची मला परवानगी देऊन खूप त्याग केला आहे. कोव्हिड 19 च्या नियमामुळे पाकिस्तानचा दौरा करणे हे आणखी आव्हानात्मक बनले होते. आता माझ्यासाठी कुटुंबाला प्राथमिकता देणे आणि कोचिंगचं नवं आव्हान स्विकारण्याची वेळ आली आहे.'
ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई, वाढदिवशी आली मोठी अपडेट
न्यूझीलंडचे ऑफ स्पिनर असलेल्या ब्रॅडबर्न यांनी 1990 ते 2001 या काळात 7 टेस्ट आणि 11 वन-डे सामने खेळले आहेत. ते यापूर्वी न्यूझीलंड ए आणि न्यूझीलंड अंडर 19 टीमचेही कोच होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.