• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या निवडीनंतर रवी शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया, धोनीबद्दल म्हणाले...

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या निवडीनंतर रवी शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया, धोनीबद्दल म्हणाले...

टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची टीमचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी धोनीच्या नियुक्तीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये ऑफ स्पिनर आर. अश्विनचा (R. Ashwin) समावेश करण्यात आला आहे. अश्विनचं चार वर्षानंतर टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची टीमचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता धोनी या वर्ल्ड कपच्या दरम्यान टीमसोबत ड्रेसिंग रुममध्ये असेल. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी धोनीच्या नियुक्तीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना धोनीच्या नियुक्तीचं स्वागत केलं आहे. 'टीमसाठी यापेक्षा जास्त चांगलं काही होऊ शकत नाही. महेंद्रसिंह धोनी टीमसोबत जोडला जात आहे. BCCI नं खरंच चांगला विचार केला आहे, आणि ती योजना पूर्ण केली आहे. धोनी ड्रेसिंग रुममध्ये असल्यानं खेळाडूंचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. हा अतिशय चांगला निर्णय आहे.' असं शास्त्री यांनी म्हंटलं आहे. 2007 साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. याचसह 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. यानंतर मात्र भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. आता पुन्हा एकदा धोनीची टीममध्ये एण्ट्री झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर अफगाणिस्ताननं बदलला कॅप्टन, राशिदच्या जागी 'या' खेळाडूची नियुक्ती भारतीय टीम : विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
  Published by:News18 Desk
  First published: