मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : रबाडाची हॅट्रिक, इंग्लंडचा पहिला पराभव, तरी दक्षिण आफ्रिका आऊट!

T20 World Cup : रबाडाची हॅट्रिक, इंग्लंडचा पहिला पराभव, तरी दक्षिण आफ्रिका आऊट!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa vs England) कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) शेवटच्या ओव्हरला हॅट्रिक घेतली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa vs England) कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) शेवटच्या ओव्हरला हॅट्रिक घेतली आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa vs England) कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) शेवटच्या ओव्हरला हॅट्रिक घेतली आहे.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 6 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa vs England) कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) शेवटच्या ओव्हरला हॅट्रिक घेतली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीयमधली रबाडाची ही पहिलीच हॅट्रिक आहे. रबाडाच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 10 विकेटने पराभव केला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला इंग्लंडचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला असला तरी त्यांना सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळणार नाही. 190 रनचं आव्हान मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 130 रनवर रोखण्याची गरज होती, पण इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 179 रन केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आलं.

दक्षिण आफ्रिकेच्या 190 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये 14 रनची गरज होती, पण रबाडाने पहिल्या तीन बॉलला क्रिस वोक्स, इयन मॉर्गन आणि क्रिस जॉर्डनला माघारी धाडलं, त्यामुळे इंग्लंडचं कमबॅक अशक्य झालं. रबाडाच्या तीन विकेटशिवाय प्रिटोरियस आणि शम्सीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर एनरिच नॉर्कियाला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 37 रन केले. तर डेव्हिड मलान 33 रन, लियाम लिव्हिंगस्टोन 28 रन आणि जॉस बटलर 26 रन करून आऊट झाला. जेसन रॉय पायाला दुखापत झाल्यामुळे 20 रनवर रिटायर्ड हर्ट झाला, यानंतर तो पुन्हा खेळायला येऊ शकला नाही. रॉयची दुखापत इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे, कारण त्याची दुखापत गंभीर असेल तर इंग्लंडला सेमी फायनलमध्ये त्याच्याशिवायच मैदानात उतरावं लागेल.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडने सुरुवातीलाच रिझा हेन्ड्रिक्सला 2 रनवर आऊट करून दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर रस्सी व्हॅन डर डुसेनने क्विंटन डिकॉक आणि मग एडन मार्करमच्या साथीने इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. रस्सी व्हॅन डर डुसेनने 60 बॉलमध्ये नाबाद 94 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 6 सिक्स आणि 5 फोरचा समावेश होता. एडन मार्करमने 25 बॉलमध्ये 52 रन केले. मार्करमने 4 सिक्स आणि 2 फोर मारले. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

सेमी फायनलच्या तीन टीम ठरल्या

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातला सामना फक्त या दोनच टीम नाही तर ऑस्ट्रेलियासाठीही महत्त्वाचा होता. कारण दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी जर इंग्लंडला 130 रनवर रोखलं असतं तर त्यांचा सेमी फायनलचा प्रवेश निश्चित झाला असता आणि ऑस्ट्रेलिया या रेसमधून बाहेर गेली असती. तसंच दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 86 रनवर रोखलं असतं तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके सेमी फायनलला पोहोचले असते. आता पहिल्या ग्रुपमधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या ग्रुपमधून पाकिस्तानची टीम सेमी फायनलला पोहोचली आहे. सेमी फायनलची चौथी टीम रविवारी ठरण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला तर न्यूझीलंडची टीम सेमी फायनलला पोहोचेल, पण अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं आणि भारताने नामिबियाला धूळ चारली तर भारतीय टीम सेमी फायनलमध्ये धडक मारेल.

First published:

Tags: England, South africa, T20 world cup