मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी ट्विटरवर का ट्रेंड होतय #BoycottPakistan?

T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅचपूर्वी ट्विटरवर का ट्रेंड होतय #BoycottPakistan?

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला 24 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही देशाचे क्रिकेट फॅन्स आपलीच टीम विजयी होईल हा दावा करत आहेत. त्याचवेळी ट्विटरवर मात्र #BoycottPakistan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला 24 ऑक्टोबरला दुबईमध्ये होणार आहे. या मॅचमधून दोन्ही टीम या स्पर्धेतील अभियानाचा शुभारंभ करतील. क्रिकेट विश्वात सध्या या मॅचची जोरदार चर्चा आहे. या मॅचची तिकीटं काही तासांमध्येच संपली आहेत. दोन्ही देशाचे क्रिकेट फॅन्स आपलीच टीम विजयी होईल हा दावा करत आहेत. त्याचवेळी ट्विटरवर मात्र #BoycottPakistan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

भारतामधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा हात आहे, हे आता जगजाहीर आहे. काश्मीरच्या प्रश्नावरही पाकिस्तान वारंवार संयुक्त राष्ट्र आणि अन्य ठिकाणी भारताचं खुसपट काढण्याचा प्रयत्न करतो. भारतासाठी मोस्ट वॉंटेड असलेल्या अनेक दहशतवाद्यांना  पाकिस्तानमध्ये आश्रय देण्यात आला आहे. यामध्ये 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम  (Dawood Ibrahim) तसंच 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीचा (Zakiur Rehman Lakhvi) समावेश आहे.

पाकिस्ताकडून होत असलेल्या गोळीबारात अनेक जवान देखील हुतात्मा झाले आहेत. त्यामुळे अनेक नेटीझन्सनी भारतानं टी20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मॅचवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये  या स्पर्धेत भारताचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व 5 मॅचमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा पराभव केला होता.

T20 World Cup: पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचं नाव, Video Viral होताच आली जाग

त्याचबरोबर 2012,  2014 आणि 2016 मध्येही टीम इंडियामं विजय मिळवला आहे. दोन्ही देशांच्या टीम 2 वर्षांनी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यापूर्वी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांची लढत झाली होती. त्यावेळी टीम इंडियानं पाकिस्तानवर 89 रननं दणदणीत विजय मिळवला होता.

First published:
top videos

    Tags: India vs Pakistan, Social media, T20 world cup