मुंबई, 12 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये ऑफस्पिनर आर. अश्विनचं (R. Ashwin) चार वर्षांनी पुनरागमन झालं आहे. तर टीम इंडियाचा मेंटर म्हणून महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) निवड झाली आहे. त्यामुळे दोन वर्षांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीचं आगमन होणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचं क्रिकेट फॅन्स आणि माजी क्रिकेटपटूंनी स्वागत केलं आहे. त्याचवेळी आता त्याच्यावर आक्षेप देखील उपस्थित झाला आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू अजय जडेजा (Ajay Jadeja) यानं या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. जडेजानं सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘मला हा निर्णय समजला नाही. यामागे काय कारण असेल याचा मी 2 दिवस विचार करत आहे. हा निर्णय म्हणजे रविंद्र जडेजाला अजिंक्य रहाणेच्या आधी पाठवण्यासारखं आहे. त्यामुळे तो असं का केलं असावं ? याचा विचार करेल’ असं जडेजा म्हणाला. ‘मी धोनीचा सर्वात मोठा फॅन’ मी महेंद्रसिंह धोनीचा सर्वात मोठा फॅन आहे, असं जडेजानं यावेळी स्पष्ट केलं. तो पुढे म्हणाला की, ‘आपलं पद सोडण्यापूर्वी पुढील कॅप्टन तयार करणारा धोनी हा पहिला कॅप्टन आहे, असं माझं मत आहे. विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये तो 2 वर्ष लिमिटेड ओव्हर क्रिकेट खेळला आहे. विराट कोहलीची कॅप्टनसी आणि रवी शास्त्री यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपसाठी मेंटरची गरज होती, असं मला वाटत नाही. खेळाडूंच्या मदतीनं टीम इंडियाला नव्या शिखरावर नेणारा कॅप्टन आहे. नंबर 1 करणारा कोच तुमच्याकडं आहे. तरीही एका रात्रीमध्ये असं काय घडलं की तुम्हाला मेंटरची गरज भासली? याचा विचार करुन मी हैरान झालो आहे,’ असं जडेजानं सांगितलं. भारतीय क्रिकेटपटूंवर होणार पैशांचा वर्षाव, गांगुली-जय शहा घेणार अंतिम निर्णय धोनी-कोहलीची पद्धत वेगळी ’ भारतीय क्रिकेट सध्या वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे. धोनीचा विचार वेगळा आहे. इंग्लंडमध्ये 4 फास्ट बॉलर्स खेळवण्यात आले. धोनीची विचार पद्धती वेगळी आहे. त्यानं स्पिनर्सना संधी दिली असती. तो कधीही 4 फास्ट बॉलर्ससह मैदानात उतरला नसता. या दोन्ही विचारांचा संगम करण्याचा हा प्रयत्न आहे.’ असा अंदाज जडेजानं व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.