Home /News /sport /

6,6,6,6,6,6... Pandey नं लगावले एका ओव्हरमध्ये 6 SIX, मॅचमध्ये केला 12 सिक्सर्सचा वर्षाव, VIDEO

6,6,6,6,6,6... Pandey नं लगावले एका ओव्हरमध्ये 6 SIX, मॅचमध्ये केला 12 सिक्सर्सचा वर्षाव, VIDEO

एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावण्याचा रेकॉर्ड क्रिकेटमध्ये नेहमी होत नाही. टीम इंडियाकडून युवराज सिंहनं (Yuvraj Singh) ही कामगिरी टी20 वर्ल्ड कपमध्ये केली आहे

    मुंबई, 5 जून : एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावण्याचा रेकॉर्ड क्रिकेटमध्ये नेहमी होत नाही. टीम इंडियाकडून युवराज सिंहनं (Yuvraj Singh) ही कामगिरी टी20 वर्ल्ड कपमध्ये केली आहे. या पराक्रमानंतर युवराजला 'सिक्सर किंग' म्हणून ओळखले जाते. टी20 इंटरनॅशनलमध्ये युवराजनंतर या प्रकारची कामगिरी करायला तब्बल 14 वर्ष लागली होती. वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन कायरन पोलार्डनं मागील वर्षी श्रीलंकेविरूद्ध एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावले होते. पाँडेचेरी टी10 लीग स्पर्धा (Pondicherry T10) सध्या सुरू आहे. या स्पर्धेत कृष्णा पांडे (Krinshna Pandey) या खेळाडूनं एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले आहेत. कृष्णानं या मॅचमध्ये वादळी बॅटींग करत फक्त 18 बॉलमध्ये 436 च्या स्ट्राईक रेटनं 83 रन केले. या खेळीत त्यानं तब्बल 12 सिक्स लगावले. रॉयल्स विरूद्ध पॅट्रीयस या एकूण 20 ओव्हर्सच्या या मॅचमध्ये दोन्ही टीमनं मिळवून 300 पेक्षा जास्त रन केले. रॉयल्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 10 ओव्हर्समध्ये 158 रनचं लक्ष्य दिलं. कृष्णा पॅट्रियसकडून चौथ्या नंबरवर बॅटींगला आला. त्यानं मैदानात येताच आक्रमक फटकेबाजी सुरू केली. खासदार असूनही IPL मध्ये काम करण्याची लाज नाही, विरोधकांच्या टीकेवर गंभीरचा सिक्सर त्यानं नितेश ठाकूरनं टाकलेल्या सहाव्या ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावले. यानंतरही कृष्णाची फटकेबाजी सुरूच होती. त्यानं 12 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 83 रन काढले. तो नवव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर आऊट झाला. कृष्णा आऊट झाल्यानंतर  त्याच्या टीमला विजयासाठी  7 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता होती. त्यांना हे रन पूर्ण करता आले नाहीत. अखेर कृष्णाच्या वादळी खेळीनंतरही त्याच्या टीमचा 4 रननं पराभव झाला.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या