जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मुंबईच्या सूर्याची 'दादा'गिरी, 'ढगाला लागली कळ' गाण्यावर केला व्यायाम, पाहा VIDEO

मुंबईच्या सूर्याची 'दादा'गिरी, 'ढगाला लागली कळ' गाण्यावर केला व्यायाम, पाहा VIDEO

मुंबईच्या सूर्याची 'दादा'गिरी, 'ढगाला लागली कळ' गाण्यावर केला व्यायाम, पाहा VIDEO

सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) जिममधील व्यायामाचा एक व्हिडीओ शेअर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये तो दिवंगत मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्या गाण्यावर व्यायाम करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जून : भारताची एक क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याचवेळी दुसरी टीम पुढच्या महिन्यात श्रीलंकेला जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवड झालेले सर्व खेळाडू सध्या मुंबईत क्वारंटाईन आहेत.  या दरम्यान हे खेळाडू स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जोरदार घाम गाळत आहेत. यामध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादवचा  (Suryakumar Yadav) देखील समावेश आहे. सूर्यानं जिममधील व्यायामाचा एक व्हिडीओ शेअर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये तो दिवंगत मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्या गाण्यावर व्यायाम करत आहे. हा व्हिडीओ क्रिकेट फॅन्ससह त्याच्या सहकाऱ्यांमध्येही लोकप्रिय झाला आहे. सूर्यकुमारसोबत श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेला मराठी खेळाडू ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) या व्हिडीओवर ‘एकदम कडक!’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंकेला जाणाऱ्या टीम इंडियाचा सूर्या हा महत्त्वाचा खेळाडू आहे.  यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या टीम इंडियामध्ये निवड होण्यासाठी सूर्याला या दौऱ्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.

जाहिरात

वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सूर्यकुमारला यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पूर्ण फायदा उठवला. त्याने 3 सामन्यात 44.50 ची सरासरी आणि 185.41 च्या स्ट्राईक रेटनं 89 रन काढले. सूर्याला श्रीलंकेच्या विरुद्ध वन-डे टीममध्ये देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी भारतीय टीम 28 जून रोजी श्रीलंकेला रवाना होईल. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात