मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Raina Brahmin Controversy: देशातील पहिल्या दलित क्रिकेटपटूबद्दल माहिती आहे का?

Raina Brahmin Controversy: देशातील पहिल्या दलित क्रिकेटपटूबद्दल माहिती आहे का?

सुरेश रैनानं (Suresh Raina) कॉमेंट्रीच्या दरम्यान ब्राह्मण (Brahmin) कार्ड वापरले आहे. रैनाच्या या वक्तव्यानंतर जातीभेदाच्या भिंती पार करत क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या पहिल्या दलित क्रिकेटपटूची (India's First Dalit Cricketer) आठवण ताजी झाली आहे

सुरेश रैनानं (Suresh Raina) कॉमेंट्रीच्या दरम्यान ब्राह्मण (Brahmin) कार्ड वापरले आहे. रैनाच्या या वक्तव्यानंतर जातीभेदाच्या भिंती पार करत क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या पहिल्या दलित क्रिकेटपटूची (India's First Dalit Cricketer) आठवण ताजी झाली आहे

सुरेश रैनानं (Suresh Raina) कॉमेंट्रीच्या दरम्यान ब्राह्मण (Brahmin) कार्ड वापरले आहे. रैनाच्या या वक्तव्यानंतर जातीभेदाच्या भिंती पार करत क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या पहिल्या दलित क्रिकेटपटूची (India's First Dalit Cricketer) आठवण ताजी झाली आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 एप्रिल: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याने  ब्राह्मण (Brahmin) असल्यामुळे आपल्याला चेन्नईची संस्कृती स्वीकारणं सोपं गेल्याचं वक्तव्य केलं आहे. रैनाच्या या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. त्याचबरोबर जातीभेदाच्या भिंती पार करत क्रिकेटचं मैदान गाजवलेल्या पहिल्या दलित क्रिकेटपटूची (India's First Dalit Cricketer) आठवण ताजी झाली आहे.

चार रुपयांचा पगार

देशात एकोणिसाव्या शतकामध्ये जातीभेद मोठ्या प्रमाणात होता. ब्रिटीशांच्या राजवटीचा वरवंटा देशवासियांवर फिरत असतानाच भारतीय समाज जातीभेदानं पोखरला होता. त्याच काळात अगदी नेमकं वर्ष सांगायचं तर 1892 साली महिना चार रुपये पगारावर बाळू पालवणकर (Balu Palwankar) यांना पुना क्लबमध्ये (Poona Club) नोकरी मिळाली होती.  पुना क्लबमध्ये त्यावेळी फक्त ब्रिटीशच क्रिकेट खेळत. पिचची देखभाल करणे, नेट लावणे ही कामं बाळू यांच्याकडे होती. ही कामं करत असतानाच ब्रिटीशांना त्यांच्यातील क्रिकेटमधील गुणवत्ता दिसली.

त्या क्लबमध्ये बॅटींग ही फक्त ब्रिटीशांसाठी राखीव होती. त्यामुळे बाळूंना फक्त बॉलिंग करण्याची संधी मिळत असे. बाळू उत्तम स्पिनर होते. पुना क्लबमध्ये अनेक तास बॉलिंग करत त्याने स्पिन बॉलिंगचं तंत्र विकसित केलं.

जातीभेदाची भिंत

ब्रिटीश राजवटीत हिंदू, मुस्लीम, पारशी अशा वेगवेगळ्या धर्माची नावं असलेली क्रिकेट क्लब होते. पुण्यातील हिंदूंनी त्यावेळी नव्या क्लबची स्थापना केली होती. युरोपीयन क्लबला हरवण्यासाठी त्यांना बाळूची गरज होती. पण ते दलित असल्यानं त्यांना टीममध्ये घ्याव की नाही हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. अखेर बाळू यांच्या क्रिकेटमधील गुणवत्तेमुळे पुण्यातील हिंदू क्लबने त्यांना संधी दिली.

बाळूंना टीममध्ये संधी मिळाली. त्यांच्या गुणवत्तेमुळे क्लबनं सामनेही जिंकले. त्यानंतरही जातीभेदाची भिंत कायम होती. त्यांना वेगळ्या कपमधून चहा मिळत असे. जेवणाची ताट-वाटी देखील वेगळी होती. क्रिकेटच्या मैदानावर एक खेळूनही त्यांना मैदानाबाहेर जातीभेदाची झळ सहन करावी लागत असे.

Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!

मुंबईत परत

पुण्यात 1896 साली प्लेगच्या साथीनं थैमान घातलं. त्यावेळी मुंबईमध्ये क्रिकेट चांगलंच बहरलं होतं. बाळू नोकरीसाठी मुंबईत परतले आणि त्यांनी पुढे मुंबईमध्ये नुकताच तयार झालेल्या हिंदू जिमखान्याच्या टीममध्ये त्यांची निवड झाली.

1906 साली बाळू यांच्या भेदक बॉलिंगमुळे हिंदू संघाने ब्रिटीश संघाला पराभूत केले. स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ब्रिटीशांचा क्रिकेटच्या मैदानात केलेला हा पराभव भारतीयांना उभारी देणारा ठरला. त्यामुळे इतर खेळाडू आणि त्यांच्यातील जातीभेदाची भिंत पडली.

इंग्लंड दौरा गाजवला

भारतीय संघ 1911 साली सर्व प्रथम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्या टीममध्ये बाळू यांचा समावेश होता. भारतीय टीमला त्या दौऱ्यात पराभवाची नामुश्की सहन करावी लागली. मात्र त्या पराभवातही बाळू यांची कामगिरी उठून दिसली. अनेक इंग्लिंश कौंटी टीमनं त्यांना खेळण्याची ऑफर दिली होती. मात्र भारतामध्येच खेळण्याचा त्यांचा निश्चय ठाम असल्यानं बाळू यांनी ही ऑफर नाकारली.

बाळू यांच्या क्रिकेट कौशल्याचं लोकमान्य टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडर यांनीही कौतुक केले होते. त्यांचे लहान भाऊ देखील हिंदू क्लबकडून क्रिकेट खेळले. मात्र केवळ दलित असल्यानं बाळू यांना टीमचं कर्णधारपद नाकारले गेले. बाळू कधीही कर्णधार होऊ शकले नाहीत. पण, त्या काळात भारतीय समाजव्यवस्थेत सर्वात तळाशी असलेल्या दलित समाजातील पहिले क्रिकेटपटू म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले.

First published:

Tags: Cricket, Dalit, Suresh raina