मुंबई, 22 जुलै : टीम इंडियाचा माजी बॅट्समन सुरेश रैनानं (Suresh Raina) ब्राह्मण (Brahmin) असल्यामुळे आपल्याला चेन्नईची संस्कृती स्वीकारणं सोपं गेल्याचं रैना म्हणाला आहे. तामीळनाडू प्रीमियर लीग म्हणजेच टीएनपीएलच्या (TNPL) कॉमेंट्रीसाठी सुरेश रैनाला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं हे वक्तव्य केले. त्यानंतर रैना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. (फोटो - sureshraina3)
कॉमेंटेटरच्या प्रश्नाचं उत्तर देताना रैना म्हणाला, 'माझ्या मते मीही ब्राह्मण आहे. 2004 पासून मी चेन्नईमध्ये खेळत आहे. मला इथल्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे. तसंच मला टीममधले सहकारीही आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत खेळलो आहे. त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे.’ (फोटो - sureshraina3)