जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL: भारत दौऱ्यानंतर श्रीलंकन खेळाडू होणार निवृत्त, घोषणा करताच केला मोठा करार

IND vs SL: भारत दौऱ्यानंतर श्रीलंकन खेळाडू होणार निवृत्त, घोषणा करताच केला मोठा करार

IND vs SL: भारत दौऱ्यानंतर श्रीलंकन खेळाडू होणार निवृत्त, घोषणा करताच केला मोठा करार

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील आगामी मालिकेनंतर श्रीलंका टीममधील अनुभवी खेळाडू निवृत्त होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 फेब्रुवारी: श्रीलंकेचा फास्ट बॉलर सुरंगा लकमलनं (Suranga Lakmal) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लकमल भारत दौऱ्यानंतर (India vs Sri Lanka) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. लकमलनं ही घोषणा करताच इंग्लंडमधील काऊंटी लीगशी करार केला आहे. त्याने डर्बीशर या कौंटी क्लबसोबत 2 वर्षांचा करार केला आहे. लकमल इंग्लंडमध्ये श्रीलंकेचे माजी कोच मिकी ऑर्थरसोबत काम करेल. लकमल डर्बीशर क्लबचे संचालक आहेत. लकमल श्रीलंकेच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटपटूंपैकी एक असल्याचा दावा ऑर्थरनं केला आहे. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात 2 टेस्ट आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला 25 फेब्रुवारीपासून सुरूवात होईल. लकमलने 68 टेस्टमध्ये 36.2 च्या सरासरीने 168 विकेट्स घेतल्या आहेत. क्रिकेटमधील सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये त्यानं 7 वेळा 4 तर 4 वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. BCCI च्या निर्णयानं बदलणार क्रिकेट! IPL सामन्यांची संख्या 94 होणार, खेळाडूंच्या आयुष्यालाही कलाटणी लकमलनं 86 वन-डे मध्ये 32.4 च्या सरासरीनं 109 विकेट्स घेतल्या आहेत. तर 11 टी20 इंटरनॅशनलमध्ये 8 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. लकमलनं 2009 साली झालेल्या नागपूरमधील वन-डे मॅचमध्ये भारताविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता तो कारकिर्दीचा शेवट देखील भारतामध्येच करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात