जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BCCI च्या निर्णयानं बदलणार क्रिकेट! IPL सामन्यांची संख्या 94 होणार, खेळाडूंच्या आयुष्यालाही कलाटणी

BCCI च्या निर्णयानं बदलणार क्रिकेट! IPL सामन्यांची संख्या 94 होणार, खेळाडूंच्या आयुष्यालाही कलाटणी

  26मार्चपासून आयपीएल-2022 चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत.

26मार्चपासून आयपीएल-2022 चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत.

आयपीएल (IPL) स्पर्धेतून होणाऱ्या मोठ्या कमाईमुळे जगभरातील क्रिकेटपटू ही स्पर्धा खेळण्याची धडपड करत असतात. बीसीसीआयच्या आगामी काळातील निर्णयानंतर संपूर्ण क्रिकेट बदलणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 फेब्रुवारी: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएल स्पर्धेला (IPL) 2008 साली सुरूवात झाली. या स्पर्धेचे आजवर 14 सिझन झाले आहेत. आता बीसीसीआनं (BCCI) 2023 ते 2027 या कालावधीसाठी आयपीएल स्पर्धेचे मीडिया राईट्सची विक्री करण्याची तयारी सुरू केली आहे. या विक्रीतून बीसीसीआयला 40 ते 45 हजार कोटी रूपये मिळतील असा अंदाज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) 10 टीम सहभागी होणार आहेत. आगामी सिझनसाठी ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. यापूर्वीच्या आयपीएलमध्ये 8 टीम सहभागी होत्या. त्यामुळे 60 सामने होत. आता 2 टीम वाढल्यानं यंदा आयपीएलमध्ये 74 सामने होणार आहेत. ‘इकोनॉमिक टाईम्स’ च्या वृत्तानुसार बीसीसीआय IPL 2023 मध्ये 74, 2024 आणि 2025 मध्ये 84 - 84 तर 2026 आणि 2027 मध्ये 94-94 सामने आयोजित करू शकते. आयपीएलमधील सामन्यांची संख्या वाढवली तर बीसीसीआयला मीडिया राईट्समधून मोठी कमाई करता येईल. यापूर्वी 2018-2022 या कालावधीसाठी स्टार इंडियानं 16,347.5 कोटी रूपयांमध्ये आयपीएलचे राईट्स खरेदी केले होते. यंदा अनेक दिग्गज हे राईट्स खरेदी करण्यासाठी येणार आहेत. खेळाडूंचे आयुष्य बदलणार आयपीएल स्पर्धेतून होणाऱ्या मोठ्या कमाईमुळे जगभरातील क्रिकेटपटू ही स्पर्धा खेळण्याची धडपड करत असतात. बीसीसीआयने सामन्यांची संख्या वाढवली तर त्यामधून त्यांची कमाई देखील वाढणार आहे. मागील वर्षीपर्यंत सर्व टीमकडे खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 85 कोटींची कमाल मर्यादा होती. ही रक्कम यंदा 90 कोटीपर्यत वाढवण्यात आली आहे. आगामी काळात सामन्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्यावरील वर्कलोड देखील वाढणार आहे. बेबी डीव्हिलियर्सचा मोठा रेकॉर्ड, IPL मध्ये होणार दमदार एन्ट्री आयसीसीनं (ICC) 2031 पर्यंत दरवर्षी एक मोठी स्पर्धा घेणार असल्याचं जाहीर केले आहे. बीसीसीआयनं आयपीएल सामन्यांची संख्या वाढवली तर जास्त काळ चालणाऱ्या स्पर्धेमुळे क्रिकेटच्या अन्य वेळापत्रकात बदल करावा लागेल. आयपीएलच्या उदयानंतर वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या टी20 लीग सुरू केल्या आहेत. या टी20 लीगमधून होणाऱ्या कमाईमुळे अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय करिअरमधून निवृत्ती घेत जगभर या स्पर्धा खेळत आहेत. त्यांचे राष्ट्रीय टीमकडे जास्त लक्ष नसते, अशी अनेकदा तक्रार केली जाते. आगामी काळात क्रिकेटपटू या स्पर्धांना आणखी महत्त्व देऊ शकतात. बीसीसीआयचा हा निर्णय जागतिक क्रिकेट आणि खेळाडूंचे आयुष्य दोन्हीमध्ये खूप मोठा बदल करणारा ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात